Pune Crime : धक्कादायक! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर चाकूने वार

पत्नीच्या चारित्र्यावर संशय (Doubts on character) घेऊन तिच्यावर धारदार चाकूने वार करीत खुनाचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना रविवारी एक ते पावणे दोन वाजण्याच्या दरम्यान विमान नगर येथील ईस्ट कोर्ट बिल्डिंगच्या खाली घडली.

Pune Crime

संग्रहित छायाचित्र

पुणे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय (Doubts on character) घेऊन तिच्यावर धारदार चाकूने वार करीत खुनाचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना रविवारी एक ते पावणे दोन वाजण्याच्या दरम्यान विमान नगर येथील ईस्ट कोर्ट बिल्डिंगच्या खाली घडली. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी (Vimantal Police)  पतीला अटक केली आहे.  (Pune Crime News)

अशोक लक्ष्मण आढाव (Ashok Laxman Adhav)  (वय ३१, रा. राजीव गांधी नगर,विमान नगर) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी स्नेहा राजू साखरे (वय २८, रा. राजीव गांधी नगर) यांनी फिर्याद दिली आहे. स्नेहा आणि अशोक हे पती-पत्नी आहेत. फिर्यादी महिला विमान नगर येथील हॉटेल बॅकस्टेज येथे गेलेली होती. त्यावेळी अशोक त्या हॉटेलमध्ये आला. त्याने तुझे लफडे दुसऱ्या मुलांबरोबर आहे, असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. त्यांना हाताने मारहाण केली. त्यामुळे फिर्यादी महिला हॉटेलमधून बाहेर येऊन थांबली.

आरोपी अशोकने तिच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करून पुन्हा मारहाण सुरू केली. 'तुला सोडत नाही. खलास करतो.' असे म्हणत त्याच्याजवळ असलेल्या धारदार चाकूने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest