Pune Crime : धक्कादायक! कारचा धक्का लगल्यावरून खून

कारचा धक्का लागून झालेल्या वादामधून धारदार हत्याराने वार करीत तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत ३० वर्षीय तरुणाचा खून (Murder) करण्यात आला. ही घटना फुरसुंगी ते चंदवाडी रोड रस्त्यावर मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास घडली.

Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

पुणे : कारचा धक्का लागून झालेल्या वादामधून धारदार हत्याराने वार करीत तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत ३० वर्षीय तरुणाचा खून (Murder) करण्यात आला. ही घटना फुरसुंगी ते चंदवाडी रोड रस्त्यावर मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी हडपसर पोलीस (Hadpsar Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News) 

अभिषेक संजय भोसले (Abhisekh Bhosale) (वय ३०, रा. शेवाळवाडी, मांजरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी विलास सुरेश सकट, कैलास सुरेश सकट, सचिन सकट (सर्व रा. चंदवाडी, फुरसुंगी) यांच्यासह आणखी ७ - ८ अनोळखी ) व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अथर्व दादासाहेब साबळे (वय १८, रा. ऑर्चीड रिसिडेन्सी, शेवाळवाडी, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांचे मामा अभिषेक हे त्यांची कार घेऊन जात होते. त्यांची गाडी घासल्याच्या कारणावरून  विलास सकट याच्याशी किरकोळ वाद झाले. त्यावरून आरोपी विलास सकट, कैलास सकट, सचिन सकट यांनी साथीदारांसह शिवीगाळ करून व जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर  लोखंडी धारदार शस्त्र व दगडाने जबर मारहाण करून त्यांना ठार मारले. मामाला वाचवायचा गेलेल्या फिर्यादी अथर्व याना देखील दगडाने व लाथाबुक्क्याने मारहाण केली. पुढील तपास सहायक निरीक्षक नानासाहेब जाधव करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest