संग्रहित छायाचित्र
लक्ष्मण मोरे
पुणे : एका वृद्ध सामाजिक कार्यकर्तीसह तिच्या सहकारी महिलेला १७ लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून डांबून ठेवण्यात आले होतें. खंडणी विरोधी पथक क्रमांक दोनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धडक कारवाई करीत याप्रकरणी चौघांना अटक केली आहे. कुख्यात बाबूलाल मोहोळ टोळीच्या म्होरक्याचा त्यात समावेश आहे.
बाबुलाल लक्ष्मण मोहोळ (वय ४५, रा. सरडे बाग, उत्तमनगर), अमर नंदकुमार मोहिते (वय ३९, रा. गणेश नगर), प्रदीप प्रभाकर नलवडे (वय ३८, रा. भूगाव), अक्षय मारूती फड (वय २४, रा. वारजे) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी वैभव भास्कर पोखरे (वय ३२, रा. किरकटवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. मोहोळवर १० गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तर, मोहितेवर पाच आणि नलवडेवर दोन गुन्हे दाखल आहेत.
ही घटना उत्तमनगर येथील किरकटवाडी येथे बुधवारी संध्याकाळी ते गुरुवार दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान घडली. फिर्यादी यांची आई मीनाक्षी या जागृती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा आहेत. त्या एनजीओ चालवतात. पुणे स्टेशन येथिल स्टॅाल मिळवून दिले नाहित म्हणून सहा लाखांचा तोटा झाला यावरून आरोपींचे मनीषा पोखरे यांच्यासोबत किरकोळ वाद आहेत. मीनाक्षी पोखरे आणि त्यांची सहकारी मनीषा पवार यांना रुद्र हॉटेल जवळ बोलावून घेण्यात आले. या दोघींना मारहाण करून त्यांना गाडीत बसून अपहरण करण्यात आली. या दोघींनाही बाबुलाल मोहोळ याच्या घरी नेऊन डांबून ठेवण्यात आले. त्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. फिर्यादी वैभव आणि त्यांच्या आईला जीवे ठार मारण्याची धमकी देत १७ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी व कर्मचारी गस्तीवर असताना पोलीस नाईक शंकर संपते यांना या घटनेबाबत माहिती मिळाली. पुणे स्टेशन येथिल स्टॅाल मिळवून दिले नाहित म्हणून ६ लाखाचा तोटा झाला असे सांगत दोघींचे अपहरण करण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यांना डांबून ठेवून मारहाण केली जात असून आरोपींनीं वैभव भास्कर पोखरे यांच्या आईला जीवे मारण्याची धमकी देऊन १७ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. खंडणी विरोधी पथकाच्या अधिकारी व अमलदारांनी उत्तमनगर येथून दोन्ही महिलांनां डांबून ठेवलेल्या ठिकाणाचा शोध घेऊन त्यांची सुटका केली. ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) सतीश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, सहायक फौजदार विजय गुरव, पोलीस अमंलदार प्रदिप शितोळ , विनोद साळुंखे , सुरेंद्र जगदाळे , राहुल उत्तरकर, शंकर संपते , संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, सचिन अहिवळे, चेतन आपटे, पवन भोसले, चेतन शिरोळकर, महिला पोलीस अंमलदार आशा कोळेकर यांनी केली.