Kalyaninagar Porsche Car Accident: अल्पवयीन आरोपीला जामीन; पोर्शे कारने चिरडून घेतला होता दोघांचा बळी

कल्याणीनगर भागात मद्यधुंद अवस्थेत पोर्शे ही महागडी कार चालवून दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीला मंगळवारी (दि. २५) जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामीन मंजूर करताना मुंबई उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत.

संग्रहित छायाचित्र

, बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याप्रकरणी उच्च न्यायालयाचे पुणे पोलिसांवर ताशेरे

कल्याणीनगर भागात मद्यधुंद अवस्थेत पोर्शे ही महागडी कार चालवून दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीला मंगळवारी (दि. २५) जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामीन मंजूर करताना मुंबई उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. Kalyaninagar Porsche Car Accident

एकदा  जामीन दिल्यानंतर पुन्हा ताब्यात घेणे बेकायदेशीर असल्याचे निरीक्षण नोंदवित निरीक्षण गृहांच्या कोठडीतून तत्काळ सुटका करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. मुलाला आईकडे सोपवण्याच्या सूचनाही न्यायालयाने दिल्या. अल्पवयीन आरोपीने ज्या दोघांना उडवलं त्या अनीश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचे पालक अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. अशात या आरोपीला आता जामीन मंजूर झाला आहे.

 हा मुलगा पुण्यातल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे. अपघात झाल्यानंतर या आरोपीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला बाल न्याय मंडळाच्या कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी कोर्टाने त्याला अपघातावर ३०० शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगून जामीन दिला होता. यामुळे पुण्यात आणि समाजमाध्यमांवर राज्यभरात खळबळ उडाली होती. या अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली होती.

 १७ वर्षे आठ महिने वय असलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत ताशी १६० किमीच्या वेगाने पोर्शे कार चालवत अनीश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांना धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की अश्विनीचा जागीच मृत्यू झाला, तर अनिशला रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अनीश हा २४ वर्षांचा तरुण होता. पुण्यात त्याने इंजिनिअरिंग केलं होतं. तसंच मागच्या काही वर्षांपासून आयटी विभागात काम करत होता, तर अश्विनी कोस्टा त्याची चांगली मैत्रीण होती. दोघेही एकाच कंपनीत काम करत होते. मित्रांसह डिनरला गेले होते. हे दोघे बाईकवरून निघाले त्यानंतर काही सेकंदातच भरधाव आलेल्या पोर्शने या दोघांना धडक दिली. यात त्या दोघांचा मृत्यू झाला.

दरम्यान, या अपघातात बळी पडलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांनी पुण्यात येऊन पुणे शहर पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्याचबरोबर घटनास्थळी भेट दिली. पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी संबंधित प्रभाग कार्यालयात जाऊन मृत्यू प्रमाणपत्र घेतले. ‘सीविक मिरर’सोबत बोलताना मृत अश्विनीचे मोठे भाऊ संप्रित कोस्टा म्हणाले, “आम्ही पोलीस आयुक्तांना भेटलो आणि या प्रकरणाबाबत चर्चा केली. हा खटला जलदगती न्यायालयात चालावा, अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केली आहे. संबंधित व्यक्तीला दोषी धरून त्यांनी केलेल्या गुन्ह्यासाठी दंड ठोठावण्यात यावा.”

‘‘हे प्रकरण मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामध्ये कोणतीही कसर राहणार नाही असा आमचा सर्वतोपरी प्रयत्न आहे. आम्ही या प्रकरणी अर्ज दाखल केला असून या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. शिशिर हिरे यांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी केली आहे,’’ असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest