Kalyani Nagar Accident: बिल्डरपुत्राच्या आजोबांनी सांगितले, वाईट संगतीपासून दूर ठेवू... आणि न्यायालयाने मंजूर केला जामीन

हिट अँड रन प्रकरणावर असलेल्या ‘जॉली एलएलबी’ चित्रपटात नातवाला वाचविण्यासाठी एक आजोबा संघर्ष करत असतात. मात्र, त्यांचे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरतात. असे असले ती पुण्यातील कल्याणीनगर येथील ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ आणि ‘हिट अँड रन’ प्रकरणात आजोबांनी केवळ हमी दिल्यामुळे नातवाला जामीन मिळाला.

Kalyani Nagar Accident

संग्रहित छायाचित्र

...त्या आजोबांचा लढा अयशस्वी ठरला,पण या आजोबांची हमी ठरली यशस्वी!

हिट अँड रन प्रकरणावर असलेल्या ‘जॉली एलएलबी’ चित्रपटात नातवाला वाचविण्यासाठी एक आजोबा संघर्ष करत असतात. मात्र, त्यांचे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरतात. असे असले ती पुण्यातील कल्याणीनगर येथील ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ आणि ‘हिट अँड रन’ प्रकरणात आजोबांनी केवळ हमी दिल्यामुळे नातवाला जामीन मिळाला. आजोबांनी त्याला वाईट संगतीपासून दूर ठेवण्याची हमी दिल्याने बाल न्याय मंडळाने १७ वर्षे आठ महिन्यांच्या तरुणाला हा जामीन दिला.

रविवारी (दि. २०) पहाटे अडीचच्या सुमारास बिल्डरच्या मुलाने भरधाव पोर्शे कार चालवित मोटारसायकलला धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की मोटारसायकलवर बसलेले अनिश अवधिया (२४) आणि अश्विनी कोष्टा (२४) हे दोघे घटनास्थळीच मृत्युमुखी पडले. पोर्शे कार चालविणारा चालक अल्पवयीन असल्याने त्याला पुणे येथील बाल न्याय मंडळात सादर करण्यात आले होते.या तरुणाला जामीन मिळण्यास पुण्यातील प्रख्यात बिल्डर असलेल्या त्याच्या आजोबांची हमी महत्त्वाची ठरली, असे ऑर्डरवरून स्पष्ट झाले आहे.

अल्पवयीन आरोपीच्या आजोबांनी न्यायालयास हमी दिली की, या विधिसंघर्षित बालकाला कोणत्या प्रकारच्या वाईट मित्रमंडळींपासून (कंपनी) दूर ठेवू. त्याचबरोबर तो त्याच्या अभ्यासावर तसेच त्याच्या  करिअरसाठी उपयुक्त असलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांवर लक्ष केंद्रित करेल. न्यायालयाने या हमीसोबत साडेसात हजार रुपयांच्या बॉंडवर त्याला जामीन दिला.

याबाबत ॲड. प्रशांत पाटील यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, ‘‘या तरुणाची जामिनावर सुटका झाली तरी तो पुराव्याशी छेडछाड करणार नाही. त्याचबरोबर न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातून फरार होण्याचा प्रयत्न करणार नाही.’’

न्यायालयाने आजोबांच्या हमीसह या विधिसंघर्षित तरुणाला १५ दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर त्याला ‘रस्ते अपघात आणि त्यांचे निराकरण’ या विषयावर निबंध लिहिण्यास सांगण्यात आले आहे. व्यसनमुक्तीसाठी त्याला पुण्यातील मुक्तांगण केंद्रामध्ये पाठविण्यात येणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest