Yerawada Jail : ललित पाटील ड्रग्ज प्रकरण ताजे असतानाच कारागृहातील कैद्याकडे मिळाले चरस; एकच खळबळ

खुनाच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीमध्ये येरवडा कारागृहात (Yerawada Jail) असलेल्या एका कैद्याकडे चरस हा अमली पदार्थ (Drugs)आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. एकीकडे ललित पाटील ड्रग्ज प्रकरण (Lalit Patil Drug Case) ताजे असतानाच दुसरीकडे थेट कारागृहातच कैद्याकडे अमली पदार्थ आढळून आल्याने तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Thu, 19 Oct 2023
  • 09:31 am
Yerawada Jail

कारागृहातील कैद्याकडे मिळाले चरस

येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा

पुणे : खुनाच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीमध्ये येरवडा कारागृहात (Yerawada Jail) असलेल्या एका कैद्याकडे चरस हा अमली पदार्थ (Drugs)आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. एकीकडे ललित पाटील ड्रग्ज प्रकरण (Lalit Patil Drug Case) ताजे असतानाच दुसरीकडे थेट कारागृहातच कैद्याकडे अमली पदार्थ आढळून आल्याने तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. या कैद्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयामधून परत आल्यावर त्याची तपासणी करीत असताना त्याने स्वतःच्या शरीरात हा अमली पदार्थ लपविल्याचे समोर आले.

शुभम उर्फ बारक्या हरिश्चंद्र पस्ते (रा. संगम हाउसिंग सोसायटी, तळवडे, निगडी) असे आरोपीचे नाव आहे. समाधान बाबुराव हसतीकर (वय ३३, रा. जेल कॉर्टर्स) यांनी यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम पस्ते याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्यामध्ये तो सध्या येरवडा कारागृहामध्ये न्याय बंदी म्हणून राहतो. त्याची आज कोर्ट पेशी होती. त्यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते.

न्यायालयामध्ये गेल्यानंतर तो तेथील स्वच्छतागृहात गेला. त्या ठिकाणी कोणीतरी वीस ग्रॅम चरसची पुडी दिली. न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यानंतर पोलीस त्याला घेऊन पुन्हा येरवडा कारागृहात आले. त्यावेळी नियमाप्रमाणे त्याची खुली झडती घेण्यात आली. तसेच, त्याची यांत्रिक तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या शरीरात काहीतरी पदार्थ असल्याचा अलर्ट मिळाला. त्यानुसार त्याला स्वच्छतागृहात नेऊन तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्याने त्याच्या पार्श्वभागामध्ये चरस असलेली ॲल्युमिनियम फॉईलची पुडी लपविण्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच्या विरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विष्णू होले करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest