Pune Crime News : ज्वेलर्स व्यावसायिकाला लुटणारे जेरबंद, ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

'शिवापूर वाडा' गावच्या हद्दीमधील आकांक्षा ज्वेलर्सच्या मालकाला धक्काबुक्की करीत साडेसहा लाख रुपयांचा ऐवज पळवणाऱ्या चोरट्यांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

Pune Crime News : ज्वेलर्स व्यावसायिकाला लुटणारे जेरबंद, ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

ज्वेलर्स व्यावसायिकाला लुटणारे जेरबंद, ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : 'शिवापूर वाडा' गावच्या हद्दीमधील आकांक्षा ज्वेलर्सच्या मालकाला धक्काबुक्की करीत साडेसहा लाख रुपयांचा ऐवज पळवणाऱ्या चोरट्यांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन किलो चांदी आणि साडेआठ तोळे सोन्याचे दागिने असा सहा लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे.

रोहित उर्फ बाबा प्रकाश साठे (वय २५, रा. अण्णाभाऊ साठे वसाहत, सहकारनगर), निखिल भगवंत कांबळे (वय २८, रा. आई माता मंदिरजवळ, बिबवेवाडी), निलेश दशरथ झांजे (वय २५, रा. वडगाव झांजे, ता. वेल्हा), शफिक मकसूद हावरी (वय २९, रा. नीलकमल सोसायटी, इंदिरानगर, कुंभारवाडा) अशी आरोपींची नावे आहेत. गुन्ह्याचा मास्टरमाईन्ड निलेश पांडुरंग डिंगळे (रा. कल्याण, ता. हवेली) आणि  त्यांचा साथीदार साहिल पटेल (रा. आंबेडकर वसाहत, लक्ष्मी नगर) हा पसार झाला आहे. याप्रकरणी यशवंत राजाराम महामुनी (रा. शिवापूर, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महामुनी यांचा शिवापुर वाडा गावामध्ये आकांक्षा ज्वेलर्स नावाने सराफी व्यवसाय आहे. ५ नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद केले. त्यानंतर, दुकानामधील सोन्या-चांदीचे दागिने घेऊन ते घराकडे जात होते. कोंढणपूर रस्त्यावर त्यांना दोन मोटरसायकलवरून आलेल्या आरोपींनी धक्काबुक्की करून सोन्या-चांदीचे दागिने असलेल्या सहा लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर राजगड पोलीस ठाणे आणि  स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू करण्यात आलेला होता. दरम्यान, तांत्रिक पोलिसांना आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज तपासादरम्यान प्राप्त झाले होते. त्याचे तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले होते. सलग दहा दिवस वेगवेगळे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपी शिवापुर मार्गे राठीवडे, त्यानंतर आंबवणे मार्गे कापूरहोळ या गावांच्याच्या दिशेला निघून गेल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. परंतु, आरोपींची नावे निष्पन्न होत नव्हती. स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने खबऱ्यांमार्फत माहिती काढून आरोपींची माहिती प्राप्त केली.  यातील निलेश डिंगळे हा मास्टर माईंड असल्याचे समोर आले. त्याने रोहित, निखिल, साहिल आणि निलेश यांच्या मदतीने ही चोरी केल्याचे समोर आले. पोलिसांनी यातील चौघांना अटक केली आणि त्यांच्याकडून चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत केला. गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्याचे निरीक्षक शिळीमकर यांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या पथकाने केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest