Police Molested : पोलीस दलात खळबळ; पोलिसानेच केला कॉलेज युवतीचा विनयभंग

डेक्कन परिसरातील एका प्रसिद्ध महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या १७ वर्षीय युवतीचा मोबाईल क्रमांक घेऊन तिला मेसेज पाठवित विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Thu, 12 Oct 2023
  • 03:00 pm

पोलिसानेच केला कॉलेज युवतीचा विनयभंग

विश्रामबाग ठाण्यातील कर्मचाऱ्याविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लक्ष्मण मोरे

डेक्कन परिसरातील एका प्रसिद्ध महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या १७ वर्षीय युवतीचा मोबाईल क्रमांक घेऊन तिला मेसेज पाठवित विनयभंग (Police Molested) करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस (Vishram Bagh Police)ठाण्यात नेमणुकीस असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून त्याच्यावर लवकरच कारवाई केली जाणार आहे. (Pune Police)

केशव इरतकर (बक्कल क्रमांक ७८४०) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीने फिर्याद दिली आहे. या मुलीचे वडील लष्करात वरिष्ठ अधिकारी आहेत. ती कुटुंबासह लोहगाव परिसरात राहण्यास आहे. ही मुलगी शिकत असलेल्या बीएमसीसी रस्त्यावरील एका महाविद्यालयात पदवीदान कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयात शिकणारे कनिष्ठ वर्गातील विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम करीत होते. आरोपी पोलीस कर्मचारी केशव इरतकर हा याठिकाणी बंदोबस्तासाठी आलेला होता.

बंदोबस्तात असतानाच मुलांशी बोलत असताना त्याने काही जणांशी ओळख वाढविली. तेथे असलेल्या युवतीसोबतही त्यांनी विविध विषयांवर गप्पा मारल्या. तिच्याकडे त्याने मोबाईल क्रमांक मागितला. तिने नकार दिल्यानंतरही त्याने तिचा मोबाईल क्रमांक स्वत:च्या मोबाईलमध्ये सेव्ह केला. त्यानंतर तिला मेसेज केले. तिने त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्याने मेसेज करून घरी भेटायला बोलावत विनयभंग केला. दरम्यान, पिडीत मुलीने पोलीस काका आपल्याला त्रास देत असल्याबाबत आईवडीलांकडे तक्रार केली. आईवडिलांना घेऊन ही युवती थेट डेक्कन पोलीस ठाण्यात पोचली. पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हा दाखल करून घेत तपासाला सुरुवात केली आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक वर्षा शिंदे करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest