Pune Crime : पुण्यात कामावरून काढल्याच्या रागातून दोन तरुणांकडून ऑफिसची तोडफोड

कामावरुन काढून टाकल्याच्या कारणावरुन दोन तरुणांनी ऑफिसमध्ये शिरुन धारदार शस्त्राने सामानाची तोडफोड करत ऑफिस मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Pune Crime

संग्रहित छायाचित्र

पुण्यातील हडपसर भागातील घटना

पुणे : कामावरुन काढून टाकल्याच्या कारणावरुन दोन तरुणांनी ऑफिसमध्ये शिरुन धारदार शस्त्राने सामानाची तोडफोड करत ऑफिस मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस (hadpsar Police) स्टेशन मध्ये दोन तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. अभिजीत चव्हाण आणि रोहित चव्हाण असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Crime News) 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे 15 नंबर येथील टीव्हीएस शोरुम येथे काम करत होते. त्यांना कामावरुन काढून टाकले होते. याच कारणावरुन आरोपींनी बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या ऑफिसमध्ये आले. त्यांनी सोबत आणलेल्या लोखंडी धारदार हत्याराने फिर्यादी यांच्या ऑफिसमधील संगणक, प्रिंटर व इतर वस्तूंची तोडफोड केली. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest