लष्करी वर्दीमध्ये लेफ्टनंट असल्याचा रुबाब मिरवणाऱ्या तोतयास ठोकल्या बेड्या
पुणे : लष्करी वर्दीमध्ये लेफ्टनंट असल्याच्या रुबाबात फिरणारा तोतयाला रेल्वे पोलीस आणि मिलिटरी इंटेलिजन्सच्या जेरबंद केले. दिल्लीतील हायप्रोफाईल कॅन्टोन्मेट एरिया तसेच 15 ऑगस्ट कार्यक्रमात लाल किल्ल्यातही तो लष्करी अधिकारी म्हणून घुसला होता.
विक्रम विश्वकर्मा ( वय 20, रा. इटावा, जि. सिध्दर्थनगर) असे त्याचे नाव आहे. रेल्वे पोलीस दलाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी.के. यादव आणि अशोक चांदूरकर मिलिट्री इंटीलेजन्स अधिकाऱ्यांच्या सहकार्याने ही कारवाई केली. विक्रम विश्वकर्मा हा पुणे रेल्वे स्टेशन येथे 6 नंबर प्लॅटफॉर्मवर लष्करी गणवेश घालून फिरत होता. संशय आल्याने रेल्वे पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्याने आपण लष्करी अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर मिलीट्री इंटीलीजेंस अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्याचे ओळखपत्र किंवा युनिट बाबत विचारल्यावर काहीही सांगता आले नाही. त्यामुळे तो तोतया असल्याचे उघड झाले.
धक्कादायक म्हणजे अशाच प्रकारे गणवेश परिधान करून तो दिल्लीतील हायप्रोफाईल कॅन्टोन्मेंट एरियामध्ये फिरत होता. 15 ऑगस्ट सगळ्यात त्यांनी पास नसतानाही प्रवेश मिळविला होता. बड्या अधिकाऱ्यांसोबत फोटोही काढून घेतले होते.