खेड : बाजरीच्या शेतात महिलेचा विनयभंग, गुन्हा दाखल

“मला किस पाहिजे”, असे म्हणत एका तरुणाने बाजरीच्या शेतात काम करणाऱ्या महिलेसोबत जबरदस्ती केली. तसेच पाठीमागून मिठी मारत महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ३० मे रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दौंडकरवाडी येथील शेतात घडला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 31 May 2023
  • 01:35 pm
बाजरीच्या शेतात तरुणाची जबरदस्ती रासलीला

संग्रहित छायाचित्र

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दौंडकरवाडी येथील महिलेचा विनयभंग

मला किस पाहिजे, असे म्हणत एका तरुणाने बाजरीच्या शेतात काम करणाऱ्या महिलेसोबत जबरदस्ती केली. तसेच पाठीमागून मिठी मारत महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ३० मे रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दौंडकरवाडी येथील शेतात घडला आहे.

या प्रकरणी सोपान ज्ञानेश्वर गुजर (वय ३२, रा. मु. पो. शेलपिंपळगाव, रामगनर, गुजर वस्ती, राम मंदीराजवळ, ता. खेड जि. पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ३० मे रोजी खेड तालुक्यातील दौंडकरवाडी येथील शेतकरी रोहिदास लांडे यांच्या बाजरीच्या शेतात काम करत होत्या. यावेळी आरोपी तरुण सोपानने महिलेला पाठीमागून मिठी मारली. यात महिला खाली पडल्यानंतर मला किस पाहिजे, अशी मागणी सोपानने केली. मात्र, हातात असलेला बाजरी कापण्याचा विळा दाखवत पीडित महिलेने तरुणाला बाजूला ढकलून दिले.

महिलेने तरुणाला बाजूला ढलताच त्याने पीडितेचे ब्लाऊज फाडले. झालेल्या प्रकाराबाबत कुणाला काही सांगितले तर, तुझ्याकडे बघतो, अशी धमकी तरुणाने दिली. मात्र, महिलेच्या हातात असलेला बाजरी कापण्याचा विळा बघून तरुण निधून गेला. या प्रकरणी पीडित महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलीसांनी आरोपी सोपान विरोधात कलम ३५४, ३५४ (अ) ३५४ ( ब ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चाकण पोलीस करत आहेत. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest