मुलीच्या प्रेमासाठी पतीचा काढला काटा, सुमारे २३० सीसीटीव्ही तपासत आरोपीला केले गजाआड

खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने या व्यक्तीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्यात आले होते. यामध्ये यातील व्यक्ती पूर्णतः जळालेला असल्याने त्याची ओळख पटत नव्हती. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी शिक्रापूर ते चंदन नगर-वडगाव शेरी असे तब्बल २३० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आरोपींला अटक केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Monika Yenpure
  • Tue, 6 Jun 2023
  • 03:08 pm
Murder : मुलीच्या प्रेमासाठी पतीचा काढला काटा, सुमारे २३० सीसीटीव्ही तपासत आरोपी केले गजाआड

सुमारे २३० सीसीटीव्ही तपासत आरोपीला केले गजाआड

वेब सिरीज पाहून हत्येचा रचला होता कट

पुण्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये १ जून रोजी सकाळच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. जॉन्सन कॅजिटन लोगो असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने या व्यक्तीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्यात आले होते. यामध्ये यातील व्यक्ती पूर्णतः जळालेला असल्याने त्याची ओळख पटत नव्हती. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी शिक्रापूर ते चंदन नगर-वडगाव शेरी असे तब्बल २३० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आरोपींला अटक केली आहे.

सीसीटीव्ही तपासामध्ये पोलिसांना वॅगनआर कार संशयित आढळली. या कारची अधिक माहिती घेतल्यानंतर ही गाडी जॉय कसबे याच्या नावावर असल्याचे समजले. त्यानुसार त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीमध्ये ॲग्नेल जॉय कसबे याने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानुसार ॲग्नेल जॉय कसबे (वय २३), सेंड्रा जॉन्सन लोबो (वय ४३) आणि एक अल्पवयीन अशा तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेला प्राथमिक माहितीनुसार, आरोपी ॲग्नेल जॉय कसबे याचे अल्पवयीन मुली सोबत प्रेम संबंध होते. अल्पवयीन मुलगी ही आरोपी सेंड्रा लोबो आणि हत्या झालेल्या व्यक्तीची मुलगी आहे. मुलीच्या प्रेमसंबंधाला मयत व्यक्तीचा विरोध होता. मात्र आईची संमती होती. सेंड्रा लोबो व मयत व्यक्ती यांची एकमेकांवर असलेल्या संशयावरून देखील वारंवार भांडणे होत होती. यामुळे मयतास कायमचा दूर करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या क्राईम वेब सिरीज पाहून हा सर्व कट आरोपींनी संगनमताने रचला.

जॉन्सन याला ३० मे रोजी रात्री घरात डोक्यात वरवंटाने मारून तसेच चाकूने मानेवर वार करून खून केला. त्यानंतर मृतदेह एक दिवस घरात ठेवून विल्हेवाट करून पुरावा नष्ट कसा करायचा याचा विचार केला. त्याप्रमाणे ३१ मे रोजी रात्रीच्या वेळी मयत व्यक्तीस वॅगनआर कार मध्ये टाकून पेट्रोल पंपाच्या अलीकडे थांबून त्याच्यावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिले. इतकेच नव्हे तर जॉन्सन लोबो हयात आहे, असे नातेवाईकांना भासवण्यासाठी त्याची पत्नी जॉन्सनच्या व्हाट्सअपवरून विविध स्टेटस टाकत होती. तसेच चार तारखेला मयत व्यक्तीच्या पत्नीचा वाढदिवस होता. त्यावेळी देखील जॉन्सनच्या फोनवरून व्हाट्सअपला स्टेटस टाकण्यात आले होते. परंतु पोलिसांना मृतदेह मिळतात पोलिसांनी सीसीटीव्हीचा आधारीत तपास करत वेळीच हा गुन्हा उघडकीस आणला आहे. त्यांच्यावर कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पुणे ग्रामीण पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest