विवाहितेचा सासरच्याकडून छळ; पतीसह पाच जणांविरोधात कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल

पुण्यातील कोंढवा परिसरात विवाहितेचा सासरच्याकडून छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नवीन फ्लॅट घेण्यासाठी माहेरवरून पाच लाख रुपये घेऊन येण्याचा तगादा लावत शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार पीडितेने दाखल केली आहे. या तक्रारीवरून कोंढवा पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Tue, 29 Aug 2023
  • 03:34 pm
Pune Crime : विवाहितेचा सासरच्याकडून छळ; पतीसह पाच जणांविरोधात कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल

संग्रहित छायाचित्र

पुण्यातील कोंढवा परिसरात विवाहितेचा सासरच्याकडून छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नवीन फ्लॅट घेण्यासाठी माहेरवरून पाच लाख रुपये घेऊन येण्याचा तगादा लावत शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार पीडितेने दाखल केली आहे. या तक्रारीवरून कोंढवा पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला आहे. हा सर्व प्रकार ७ डिसेंबर २०२० ते जुलै २०२२ या कालावधीत कोंढव्यातील कौसरबाग तसेच विमाननगरमध्ये घडला आहे.

पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी शोएब अशफाक शेख, पती (वय २५), अशफाक दादामिया शेख सासरे (वय ५५),शिरीन अशफाक शेख,सासू (वय ४४),अरबाज अशफाक शेख,दीर  (वय २२), आणि अल्पवयीन नंणंद (सर्व रा. कौसरबाग, कोंढवा) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिसांनी सासऱ्यास अटक केली मात्र अद्याप पतीस अटक केलेली नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचे आरोपी पती शोएब सोबत दुसरे लग्न झाले आहे. लग्नात हुंडा दिला नाही, मानपान केला नाही म्हणत पीडितेला शारिरीक व मानसिक त्रास दिला. तसेच फ्लॅट खरेदी करण्यासाठी माहेरवरुन पाच लाख रुपये आण, असा तगादा लावला होता. माहेरवरुन पैसे आणले नाहीत तर तलाक देण्याची धमकी पतीने महिलेला दिली.

दरम्यान, या सर्व प्रकाराबाबत महिलेने सासरे अशफाक शेख यांच्या कानावर टाकला. मात्र त्यांनीही महिलेसोबत गैरवर्तन केले तसेच तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन विनयभंग केला. या त्रासाला कंटाळून महिलेने अखेर पोलिस स्टेशन गाठले व तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस करत आहेत. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest