Pune Crime News : समलैंगिक संबंधातून तरुणाचा खून करणारा गजाआड, आरोपी निघाला सिव्हिल इंजिनियर

समलैंगिक संबंधामधून तरूणावर कोयत्याने वार करीत त्याचा खून करण्यात आल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी सिव्हिल इंजिनियर असून विवाहीत असल्याचे समोर आले आहे.

Pune Crime News : समलैंगिक संबंधातून तरुणाचा खून करणारा गजाआड, आरोपी निघाला सिव्हिल इंजिनियर

समलैंगिक संबंधातून तरुणाचा खून करणारा गजाआड, आरोपी निघाला सिव्हिल इंजिनियर

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने झालेली दोन वर्षांपूर्वी ओळख

पुणे : समलैंगिक संबंधामधून तरूणावर कोयत्याने वार करीत त्याचा खून करण्यात आल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी सिव्हिल इंजिनियर असून विवाहीत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यामध्ये दोन वर्षांपासून समलैंगिक संबंध होते. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. ही घटना मंगळवारी संध्याकाळी वाघोली येथील बकोरी रस्त्यावर घडली होती.

सागर अशोक गायकवाड (वय ३२, रा. वाघजाईनगर, दौंड) असे आरोपीचे नाव आहे. महेश डोके (वय २१, सध्या रा. स्टुडेंट हॉस्टल, वाघोली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ काईंगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, की महेश हा वाघोलीमधील बीजीएस कॉलेजमध्ये 'बीबीए'च्या शेवटच्या वर्षात शिकत होता. तो वाढेबोल्हाई येथे एका हॉस्टेलमध्ये राहत होता. तर, आरोपी सागर गायकवाड हा विवाहीत आहे. त्याचे पत्नीशी कौटुंबिक वाद आहेत. पत्नी त्याच्या सोबत राहात नाही. दोन वर्षांपूर्वी सागर याने महेश याला दुचाकीवरून लिफ्ट दिली होती. तेव्हापासून त्यांची ओळख होती. त्यांचे एकमेकांशी सतत बोलणे होत होते. सागर त्याला महाविद्यालयात सोडायला आणि आणायला जात होता. त्यामुळे या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. त्यामधून समलैंगिक संबंध निर्माण झाले. परंतु, मागील काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये वाद सुरू झाले होते. त्यामुळे सागर चिडलेला होता.

महेश मंगळवारी सायंकाळी बकोरी रस्त्यावरून जात होता. त्यावेळी सागरने त्याच्यावर कोयत्याने वार करून हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महेशला टाकून तो पसार झाला होता. एका नागरिकाने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून त्याला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्याचा ससून रुग्णालयात पोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. जखमी महेशने मृत्यूपूर्वी त्या व्यक्तीला सागरने हल्ला केल्याचे सांगितले होते. पोलिसांनी उपलब्ध वर्णन आणि आरोपीच्या नावावरून त्याचा शोध घेतला. त्याला अटक करण्यात आली असून शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे काईंगडे यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest