Pune Crime News : बेकायदा पिस्तुल बाळगणारा गजाआड, भारती विद्यापीठ पोलीसांची कारवाई

बेकायदा गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या ४१ वर्षीय व्यक्तीला भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून ४० हजार रुपयांचे गावठी पिस्तूल आणि ४०० रुपयांची दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आलेली आहे.

Pune Crime News : बेकायदा पिस्तुल बाळगणारा गजाआड, भारती विद्यापीठ पोलीसांची कारवाई

बेकायदा पिस्तुल बाळगणारा गजाआड, भारती विद्यापीठ पोलीसांची कारवाई

पुणे : बेकायदा गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या ४१ वर्षीय व्यक्तीला भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून ४० हजार रुपयांचे गावठी पिस्तूल आणि ४०० रुपयांची दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आलेली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश हनुमंत मालुसरे (वय ४१, रा. ओम हाइट्स, सिद्धिविनायक सोसायटी, जांभूळवाडी रोड, आंबेगाव खुर्द) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी महेश बारवकर आणि निलेश ढमढेरे यांना खबऱ्यामार्फत मालुसरे याच्याबाबत माहिती मिळाली होती. मालुसरे हा जांभुळवाडी तलावाजवळ येणार असून त्याच्याकडे गावठी पिस्तूल असल्याचे पोलिसांना समजले होते. त्यानुसार तपास पथकाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जांभूळवाडी तलाव परिसरामध्ये त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

तेथील मामा पान शॉपच्या पुढील पुलावर मालुसरे उभा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याला ताब्यात घेऊन त्याचे अंगझडती घेण्यात आली. त्यामध्ये त्याच्याकडे हे बेकायदा अग्निशस्त्र मिळून आले. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिकगिरीश दिखावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक धीरज गुप्ता यांच्या पथकाने केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest