गायकवाड, विटकर टोळ्यांना पोलिसांकडून मोक्काचा दणका

संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये नऊ महिन्यांत २९ टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली असून, २४५ सराईत गुन्हेगारांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. यामध्ये भोसरीमधील गायकवाड तसेच दिघीमधील विटकर या टोळ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Sat, 9 Sep 2023
  • 04:40 pm
Pune Crime news

संग्रहित छायाचित्र

संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये नऊ महिन्यांत २९ टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली असून, २४५ सराईत गुन्हेगारांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. यामध्ये भोसरीमधील गायकवाड तसेच दिघीमधील विटकर या टोळ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.

भोसरी परिसरातील टोळीप्रमुख सुमेध उर्फ गोट्या लहू गायकवाड (वय २६, रा. सांस्कृतिक भवन शेजारी सिद्धार्थनगर, दापोडी), अनिकेत उर्फ बॉक्सी शिरीष पठारे (वय २४, रा. कमलकुंज वार्ड नं. ५, दापोडी) आणि त्याच्या साथीदारावर सात गुन्हे दाखल आहेत. तसेच दिघी परिसरातील टोळीप्रमुख शाम रवी विटकर (वय २२, रा. साठेनगर, पद्मावती रोड, आळंदी), ज्ञानेश्वर सिध्दार्थ बडगे (वय ३०, रा. साठेनगर, पद्मावती रोड, आळंदी), राकेश सुरेश काळे (वय २३, रा. अण्णाभाऊ साठेनगर, आळंदी), अजय किसन देवरस (वय २३, रा. पद्मावती झोपडपट्टी, आळंदी) आणि साथीदारांवर नऊ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

वरील दोन्ही टोळीप्रमुखांनी त्यांच्या साथीदारांसह प्रत्येक गुन्ह्यात काही सामाईक तर  काही नवीन साथीदारांना सोबत घेऊन स्वतःची टोळी तयार केली. अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्याच्या उद्देशाने वर्चस्व तसेच दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी त्यांनी भोसरी, दिघी, आळंदी, सांगवी, चतुःश्रुंगी, फरासखाना, येरवडा परिसरात खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, खंडणी, दरोडा, दुखापत करणे, पुरावा नष्ट करणे, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे, बेकायदेशिररित्या घातक शस्त्रे आणि घातक हत्यारे जवळ बाळगणे, बेकायदेशिररित्या जमाव जमवून खुनाचा प्रयत्न करणे, विनयभंग करणे, पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखणेकामी काढलेल्या आदेशांचा भंग करणे असे गुन्हे केले आहेत. या दोन्ही टोळ्यांच्या गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाईचा बडगा उगारला.  वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले, सुनील भदाने, अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी, राजेंद्र राठोड, वसंत दळवी, चेतन साळवे, किशोर कांबळे, वैभव काकडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest