Pune Crime News : जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अटकेत

गुन्हे शाखेच्या (Crime Branch) दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने जबरी चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला जेरबंद केले. भारती विद्यापीठ परिसरात (Bhari Vidyapith Police) ही कारवाई करण्यात आली. (Pune Crime News)

Pune Crime News

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अटकेत

गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कारवाई

पुणे : गुन्हे शाखेच्या (Crime Branch) दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने जबरी चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला जेरबंद केले. भारती विद्यापीठ परिसरात (Bhari Vidyapith Police) ही कारवाई करण्यात आली. (Pune Crime News)

सोमनाथ कालिदास पवार (Somnath Pawar) (वय २०, रा. अण्णाभाऊ साठे नगर, अरण्येश्वर, सहकार नगर) असे त्याचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात कलम ३९२,३४ अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तो फरार होता. त्याच्यावर यापूर्वीचे सदर आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार, बलात्कार, चोरी आदी गुन्हे दाखल आहेत. 

दरोडा व वाहन चोरी  पथकातील पोलीस कर्मचारी खाजगी वाहनाने गस्त घालीत हकते. त्यावेळी पोलीस अंमलदार महेश पाटील व सुमित ताकपेरे यांना पवार अश्विनी लॉज,भारती विद्यापीठ परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. याठिकाणी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याला पुढील कारवाईसाठी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे, महेश पाटील, श्रीकांत दगडे, बाळू गायकवाड, गणेश ढगे, व मॅगी जाधव यांनी केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest