Pune Crime : गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक

'मोकासा होमस्टेज' नावाच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याच्या आमिषाने एका दाम्पत्याची ३ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक (Fraud) करण्यात आली. हा सर्व प्रकार ७ डिसेंबर२०२२ ते आज पर्यंत कोरेगाव पार्क येथील लिबर्टी कॉम्प्लेक्स मध्ये घडला.

Pune Crime

गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक

पुणे : 'मोकासा होमस्टेज' नावाच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याच्या आमिषाने एका दाम्पत्याची ३ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक (Fraud) करण्यात आली. हा सर्व प्रकार ७ डिसेंबर२०२२ ते आज पर्यंत कोरेगाव पार्क येथील लिबर्टी कॉम्प्लेक्स मध्ये घडला. कोरेगाव पार्क पोलिसांनी (Koregaon Park Police) याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

जुबेर बशीर अहमद, नरेन जुबेर अहमद, सुफियान जुबेर अहमद (सर्व रा. मिल्लत नगर, अंधेरी वेस्ट, मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पूजा सोनवीर यादव (वय ३५, रा. यमुना नगर, लोखंडवाला बँक रोड, अंधेरी वेस्ट, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. यादव आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपींनी संगणमत करून यादव आणि त्यांचे पती साजिद अली यांना विश्वासात घेतले. आरोपींनी त्यांचा 'मोकासा होमस्टेज' नावाचा व्यवसाय असल्याचे सांगितले. या व्यवसायाचे 'एआयआरबीएनबी' या कंपनीसोबत टायअप झालेले असल्याची बतावणी केली. हा व्यवसाय कोरेगाव पार्क परिसरात करून चांगला नफा मिळवत आहोत. या व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देऊ, असे आमिष त्यांना दाखवण्यात आले. या दोघांकडून वेळोवेळी तीन लाख २५ हजार रुपये घेऊन त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. परंतु, नफ्याची कोणती रक्कम न देता त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest