Fraud : बँकॉक-थायलंड टूरच्या बहाण्याने फसवणूक, तब्बल १३ लाखांचा घातला गंडा

हेल्थ इन्शुरन्स कंपनीने त्यांच्या एजंटसाठी बँकॉक-थायलंड या ठिकाणी आयोजित केलेल्या टूरची विमानतिकेटे आणि व्हीजा यासाठी घेतलेल्या रकमेमधून १३ लाख ३६ हजार ६६० रुपयांची आर्थिक फसवणूक केली.

Fraud : बँकॉक-थायलंड टूरच्या बहाण्याने फसवणूक, तब्बल १३ लाखांचा घातला गंडा

संग्रहित छायाचित्र

स्टार हेल्थ इंशोरन्स कंपनीला एस. डी. हॉलिडेजकडून १३ लाखांचा गंडा

पुणे : हेल्थ इन्शुरन्स कंपनीने त्यांच्या एजंटसाठी बँकॉक-थायलंड या ठिकाणी आयोजित केलेल्या टूरची विमानतिकेटे आणि व्हीजा यासाठी घेतलेल्या रकमेमधून १३ लाख ३६ हजार ६६० रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी एस. डी. हॉलिडेज या कंपनीच्या दर्शन ध्रुव यांच्या विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १४ नोव्हेंबर २०२२ पासून आज पर्यंत घडला.

याप्रकरणी कपिल कमल बजाज (वय ४१, रा. विशाल नगर, पिंपळे निलख) यांनी फिर्याद दिली आहे बजाज हे स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीमध्ये वरिष्ठ झोनल ऑफिसर म्हणून काम करतात. त्यांच्या कंपनीमार्फत एजंट लोकांसाठी डिसेंबर २०२२ मध्ये बँकॉक थायलंड येथे टूर आयोजित करण्यात आलेली होती. त्याकरिता सर्वांची विमानांची तिकिटे आणि व्हीजा या सर्व गोष्टींची पूर्तता करण्याचे काम एस डी हॉलिडेजला देण्यात आले होते. एस डी हॉलिडेच्या दर्शन ध्रुव याने ऍडव्हान्स म्हणून ८ लाख ७५ हजार १६० रुपयांची रक्कम स्टार हेल्थ अलाईड इन्शुरन्स कंपनीकडून घेतली. त्यानंतर कंपनीच्या एजंट आणि त्यांच्या नातेवाईकांना परस्पर संपर्क साधला.

त्यांना सहलीला घेऊन जातो असे सांगत त्यांच्याकडून देखील चार लाख ६१ हजार ५०० रुपये घेतल. परंतु, त्यांना कोणतेही तिकीटे देण्यात आली नाहीत. तसेच कंपनी, एजंट आणि त्यांच्या नातेवाईक व मित्रांची टूर आयोजित न करता त्यांना पैसे परत न करता १३ लाख ३६ हजार ६६० रुपयांची फसवणूक केली. या सर्वांना बनावट आरटीजीएस स्लीप आणि धनादेश पाठवून रक्कम दिल्याचे भासवण्यात आले. याप्रकरणी तक्रार अर्ज करण्यात आला होता. त्यावरून डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest