पिंपरी चिंचवड: पार्ट टाईम जॉब सांगून ऑनलाईन टास्क देत महिलेची तीन लाखांची फसवणूक

महिलेला पार्ट टाईम जॉब सांगून ऑनलाईन टास्क देत तीन लाख रुपयांची फसवणूक केली. २६ मार्च २०२४ रोजी मारुंजी येथे ही घटना घडली आहे.

संग्रहित छायाचित्र

महिलेला पार्ट टाईम जॉब सांगून ऑनलाईन टास्क देत तीन लाख रुपयांची फसवणूक केली. २६ मार्च २०२४ रोजी मारुंजी येथे ही घटना घडली आहे.

याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjwadi Police Station) मंगळवारी (१६ एप्रिल) महिलेने फिर्याद दिली असून हिंजवडी पोलीस यांनी  फिर्यादीच्या सांगण्यावरून अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवून ऑनलाईन टास्क देत १२ टास्क पूर्ण करवून घेतले. यात फिर्यादीकडून वेळोवेळी एकूण २ लाख ९२ हजार रुपये घेतले व  ते पैसे परत न देता फिर्यादीची फसवणूक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest