Fraud : युको बँकेच्या अधिकाऱ्यांकडून सोमवंशी क्षेत्रीय समाज संस्थेची फसवणूक, गुन्हा दाखल

सोमवंशीय क्षत्रिय समाज ट्रस्ट पुणे या संस्थेचे गोठविण्यात आलेले बँक खाते संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय परस्पर सुरू करून त्यातील रक्कम काढून घेत आर्थिक फसवणूक करण्यात आली.

Fraud : युको बँकेच्या अधिकाऱ्यांकडून सोमवंशी क्षेत्रीय समाज संस्थेची फसवणूक, गुन्हा दाखल

संग्रहित छायाचित्र

खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : सोमवंशीय क्षत्रिय समाज ट्रस्ट पुणे या संस्थेचे गोठविण्यात आलेले बँक खाते संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय परस्पर सुरू करून त्यातील रक्कम काढून घेत आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी युको बँकेच्या मॅनेजर, दोन असिस्टंट मॅनेजर यांच्यासह सहा जणांविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ११ जुलै २०२२ ते १६ जुलै २०२२ या कालावधी दरम्यान युको बँकेच्या रविवार पेठ शाखेमध्ये घडला.

बँकेचा मॅनेजर सैद मोहम्मद आश्रफ, (रा. वाराणसीउत्तर प्रदेश, सध्या रा. कोंढवा), असिस्टंट मॅनेजर शिवानी विनायक, असिस्टंट मॅनेजर अर्चना अग्रवाल, अनिल नारायण वाळवेकर (गंज पेठ), विनेश प्रकाश झाड (गुरुवार पेठ), मनोज मनोहर काटवे, (वंडर सिटी, कात्रज) आणि मोनाली मनीष खेरुड (श्रद्धा टेरेस, गुलटेकडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात मनोज गुरुनाथ आरसिद्ध (वय ५०, रा. गुरुवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोज आरसिद्ध हे सोमवंशीय क्षत्रिय समाज ट्रस्टचे काम करतात. या संस्थेचे रविवार पेठ मधील युको बँकेच्या शाखेत खाते होते. या खात्यामध्ये ६० हजार रुपयांची रक्कम होती. हे खाते गोठविण्यात आलेले होते. आरोपींनी फिर्यादी यांच्या परस्पर संस्थेची कोणतीही परवानगी न घेता स्वतःची केवायसी कागदपत्रे बँकेस दिली. त्यांच्या अपरोक्ष खाते चालू करून घेतले. त्याकरिता  बँकेचे मॅनेजर सैद मोहम्मद, शिवानी विनायक, अर्चना अग्रवाल आणि समाज बांधव असलेल्या वाळवेकर, झाड, काटवे, खेरूड या सर्वांनी मिळून ही रक्कम काढून घेत त्याचा अपहर केला. याप्रकरणी तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास करून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest