Maruti Navale : सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मारुती नवले यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

सिंहगड इन्स्टिट्यूटचे (Sinhagad Institute) संस्थापक मारुती निवृत्ती नवले (Maruti Navale) यांच्या विरोधात कोंढवा पोलीस (Kondhava Police) ठाण्यामध्ये अपहार आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मारुती नवले यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

पुणे : सिंहगड इन्स्टिट्यूटचे (Sinhagad Institute) संस्थापक मारुती निवृत्ती नवले (Maruti Navale) यांच्या विरोधात कोंढवा पोलीस (Kondhava Police) ठाण्यामध्ये अपहार आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी तब्बल ११६ कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०१९ ते जून २०२२ या कालावधी दरम्यान कोंढवा येथील टिळेकर नगर मध्ये असलेल्या सिंहगड सिटी स्कूल मध्ये घडला. (Pune Crime News)

याप्रकरणी राहुल एकनाथ कोकाटे (वय ५१, रा. क्रिमसन क्रिस्ट सोसायटी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. कोकाटे भविष्य निर्वाह निधी विभागात अधिकारी आहेत. नवले हे सिंहगड सिटी स्कूल चे संस्थापक आहेत. या शाळेमधील साधारण ११६ कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर २०१९ ते जून २०२२ पर्यंतच्या मासिक पगारातून भविष्य निर्वाह निधीची कपात करण्यात आलेली आहे. ७४ लाख ६८ हजार ६३६ रुपयांची एकूण कपात करून घेतलेली होती. परंतु, यातील फक्त तीन लाख ७५ हजार ७७४ रुपयांचीच रक्कम भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करण्यात आली. उर्वरित ७० लाख ९२ हजार ८६२ रुपयांचा भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून कर्मचाऱ्यांचा विश्वासघात केला. याप्रकरणी न्यायालयामध्ये तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावरून कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest