पुणे शहरात टोळक्यांकडून दहशतीचे प्रकार; विविध घटनांमध्ये तिघे गंभीर जखमी

पुणे : ऐन निवडणुकीच्या तोंडावर शहरात टोळक्यांकडून दहशत माजवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. टोळक्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये तीन जण गंभीर जखमी झाले असून, या प्रकरणी वारजे, पर्वती आणि चंदननगर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे : ऐन निवडणुकीच्या तोंडावर शहरात टोळक्यांकडून दहशत माजवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. टोळक्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये तीन जण गंभीर जखमी झाले असून, या प्रकरणी वारजे, पर्वती आणि चंदननगर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. हल्ल्यांमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणुकीच्या काळात वाढलेल्या दहशतवादी या प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलीस प्रशासनाने देखील या प्रकारांवर तात्काळ कारवाई करत आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

सिंहगड रस्त्यावर प्राणघातक हल्ला :
पहिली घटना सिंहगड रस्त्यावरील पानमळा परिसरात मंगळवारी संध्याकाळी घडली. दुचाकी आडवी घालण्याच्या साध्या कारणावरून मोठा वाद उफाळून आला आणि याच वादातून एका तरुणावर घातक हल्ला करण्यात आला. आकाश म्हस्के, गणेश रेणुसे, तेजस नायर, रोहित खडके, भैय्या पालवे, मयूर पालखे, प्रथमेश रेणुसे, अजय घाडगे आणि त्यांच्या साथीदारांनी कोयत्याने हल्ला करून दोन जणांना गंभीर जखमी केले. त्यांच्यावर पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

समीर आत्माराम महादे (वय ३२, रा. सिद्धार्थ शोरुमजवळ, सिंहगड रस्ता) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दुचाकी आडवी घालण्यावरून आरोपी आणि फिर्यादीच्या मित्रांमध्ये वाद झाला होता. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास महादे आणि त्याचे मित्र आकाश सूर्यवंशी, मीर खोचाडे, यश डोळे, अजित थोरात, अथर्व रणदिवे हे आरोपींना समजावण्यासाठी गेले होते. या दरम्यान, आरोपी तेजस नायरने त्याच्याकडील कोयत्याने महादेचा मावसभाऊ संतोष साळुंकेवर वार केले. या हल्ल्यात साळुंके गंभीर जखमी झाला. महादे आणि रिची म्हस्के यांनाही दगड फेकून मारण्यात आले. हल्ल्यानंतर परिसरात दहशत पसरली आहे. 

चंदननगरमध्ये वैमनस्यातून हल्ला:
दुसरी घटना चंदननगर परिसरात रविवारी रात्री घडली, जिथे पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर हल्ला करण्यात आला. अमित दिलीप आरणे (वय ३५, रा. वडगाव शेरी) या तरुणावर दांडके आणि गजाने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी कैलास शंकरलाल भाटी, सोहनराम अस्लाराम प्रजापती, दीपककुमार दलाराम प्रजापती, विक्रम नगाराम प्रजापती, चंदन केशराम मेघवाल आणि सुखदेव पूनराम मेघवाल या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी रात्री अमित आरणे वडगाव शेरीतील मद्य विक्री दुकानात गेले होते. पूर्वीच्या वैमनस्यामुळे आरोपींनी शिवीगाळ केली आणि नंतर दांडके व गजाने बेदम मारहाण केली. आरणे याने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, सहायक पोलीस निरीक्षक माने या प्रकरणाचा तपास करत आहेत.

कर्वेनगरमध्ये टोळक्याचा हल्ला:
तिसरी घटना कर्वेनगर भागात घडली. पूर्ववैमनस्यातून प्रतीक भोकरे, रोहित रहाटे आणि नितीन जमादार यांच्यावर हल्ला करण्यात आला. शुभम उफाळेचा आरोपींशी काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्यामुळे आरोपींनी उफाळेच्या मित्रांवर हल्ला केला. रवी जाधव, यश घोलप, बारक्या लोणारे आणि १४ ते १५ जणांच्या टोळक्याने हल्ला केला. 

या हल्ल्यात प्रतीक भोकरे, रोहित रहाटे आणि नितीन जमादार यांना गंभीर दुखापत झाली. टोळक्याने कोयत्याने वार केले आणि सिमेंटचे गट्टू फेकून मारले. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक (गुन्हे) बडाख तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest