संतापजनक! घरातच बापाकडून सुरु होते अश्लीळ चाळे, विरोध करताच दिले गरम इस्त्रीचे चटके

बाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यातून समोर आली आहे. ४३ वर्षीय नराधान बापाने १५ वर्षाच्या आपल्याच चिमुकीबरोबर अश्लिल चाळे केले आहे. यास मुलीने विरोध केल्याने तिच्या गालाला गरम इस्त्रीने चटके दिला. या घटनेनंतर शहरात संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी शहरातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात पीडित मुलीने नराधाम बापाच्या विरोधात तक्रार दाखल केली त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Sun, 3 Sep 2023
  • 04:45 pm
Pune Crime news

घरातच बापाकडून सुरु होते अश्लीळ चाळे, विरोध करताच दिले गरम इस्त्रीचे चटके

पुणे : बाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यातून समोर आली आहे.  ४३ वर्षीय नराधान बापाने १५ वर्षाच्या आपल्याच चिमुकीबरोबर अश्लिल चाळे केले आहे. यास मुलीने विरोध केल्याने तिच्या गालाला गरम इस्त्रीने चटके दिला. या घटनेनंतर शहरात संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी शहरातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात पीडित मुलीने नराधाम बापाच्या विरोधात तक्रार दाखल केली त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही शनिवार (दि.3) रोजी शाळेत जाण्याची तयारी करत होती. त्यावेळी ती शाळेच्या कपड्यांना इस्त्री करत होती. या दरम्यान तिचे वडिल आले व त्यांनी मुलीच्या मागून येऊन तिला स्पर्श केला. याला तिने विरोध केला असता नराधान बापाने तिला शिविगाळ करत तिच्या बॅगमधील पुस्तके फाडली. यादरम्यान पुन्हा आरोपी बापाने मुलीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने त्यास ढकलून दिले. त्यानंतर त्याने मुलीला गरम इस्त्रीचा चटका देत मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. 

याप्रकणी पीडित मुलीने बापाच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यावरून पोलीसांनी नराधाम बापाविरोधात गुन्हा दाखल करून घेतला. पुढील तपास पोलिस करत आहेत. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest