Pune Crime News : घरफोडी व वाहनचोरींचे पाच गुन्हे उघड; हडपसर पोलीसांची कामगीरी

: हडपसर पोलीस (Hadpsar Police) ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. यावर आळा घाडलण्याठी पोलीसांनी कंबर कसली असून हडपसर पोलीसांच्या तपास पथकाने घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आणले आहे तर एक वाहनचोरीच्या गुन्ह्याची उकल केली आहे.

Pune Crime News

घरफोडी व वाहनचोरींचे पाच गुन्हे उघड; हडपसर पोलीसांची कामगीरी

पुणे : हडपसर पोलीस (Hadpsar Police) ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. यावर आळा घाडलण्याठी पोलीसांनी कंबर कसली असून हडपसर पोलीसांच्या तपास पथकाने घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आणले आहे तर एक वाहनचोरीच्या गुन्ह्याची उकल केली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीसात गुन्हा दाखल करून घेण्यात आला आहे. (Pune Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस पेट्रोलींग करत असताना त्यांना एक संशयीत विधीसंघर्षीत मुलगा पाण्याची मोटार घेवून जाताना दिसला. दरम्यान पोलीसांनी त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे पोलीसांना आणखीच संशय बळावला त्यानंतर पोलीसांनी अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून चार घरफोडीच्या गुन्ह्याची उकल झाली. याप्रकरणी हडपसर पोलीसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. 

दुसऱ्या कारवाईमध्ये ५२ हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरणाऱ्या आरोपीस पोलीसांना ताब्यात घेतले आहे. प्रणव प्रशांत शेजुले (वय १९, रा, लोणी टोल नाक्याजवळ, कामठे वस्ती, लोणीकाळभोर) असे आरोपीचे नाव असून याप्रकरणी हडपसर पोलीसांत गुन्हा दाखल करून घेण्यात आला आहे. 

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, तपास पथक अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, व पोलीस अंमलदार यांच्या पथकाने केली आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest