पुण्यात सराईत गुन्हेगारावर गोळीबार, पोलीसांनी एकाला घेतले ताब्यात

पुण्यातील वानवडी परिसरातील महंमदवाडी रोडवर दुचाकीवरुन आलेल्या एकाने सराईत गुन्हेगारावर गोळीबार करण्यात आला आहे. यात गुन्हेगार जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री साडेअकरा वाजता घडली आहे. त्यात हा गुन्हेगार जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलीसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 6 Jun 2023
  • 12:51 pm
Firing  : पुण्यात सराईत गुन्हेगारावर गोळीबार, पोलीसांनी एकाला घेतले ताब्यात

पुण्यात सराईत गुन्हेगारावर गोळीबार

सराईत गुन्हेगाराच्या पोटात लागली गोळी

पुण्यातील वानवडी परिसरातील महंमदवाडी रोडवर दुचाकीवरुन आलेल्या एकाने सराईत गुन्हेगारावर गोळीबार करण्यात आला आहे. यात गुन्हेगार जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री साडेअकरा वाजता घडली आहे. त्यात हा गुन्हेगार जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलीसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

पच्चीस ऊर्फ फैजान रमजान शेख (वय २१, रा. सय्यदनगर, कोंढवा) असे जखमी झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पच्चीस हा गुलामअलीनगर मंहंमदवाडी परिसरातून रात्री साडेअकराच्या सुमारास निघाला होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या एकाने त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या. यात पच्चीसच्या पोटात गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे.

घटनेची माहिती मिळाताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला पच्चीवर एका खासगी रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला सासवड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest