Pune Crime : खळबळजनक ! महिलेचा हातोड्याने ठेचून खून; जडीबुटी विक्रीच्या टेंटमध्ये घडली घटना

जडीबुटी विक्री करता रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या तंबूमध्ये एका महिलेचा हातोड्याने ठेचून खून (Murder) करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी पहाटे बिबवेवाडी गंगाधाम येथील आई माता मंदिराच्या जवळ घडली.

Murder

खळबळजनक ! महिलेचा हातोड्याने ठेचून खून; जडीबुटी विक्रीच्या टेंटमध्ये घडली घटना

संशयिताला पोलिसानी घेतले ताब्यात

पुणे : जडीबुटी विक्री करता रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या तंबूमध्ये एका महिलेचा हातोड्याने ठेचून खून (Murder) करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी पहाटे बिबवेवाडी गंगाधाम येथील आई माता मंदिराच्या जवळ घडली. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. या महिलेची ओळख मात्र अद्याप पटलेली नाही. (Pune Crime News)

बिबवेवाडी येथील आई माता मंदिराजवळ जडीबुटी विक्री करण्यासाठी एक तंबू लावण्यात आलेला आहे. हा तंबू बऱ्याच महिन्यांपासून या ठिकाणी आहे. या तंबुमध्ये एका महिलेचा हातोड्याने ठेचून खून करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससूनला पाठवला. दरम्यान, पोलिसांनी एका संशय त्याला ताब्यात घेतले आहे. हा प्रकार नेमका कशामुळे घडला याचा शोध घेतला जात आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest