ACB : पोलीस दलात खळबळ! कारवाई टाळण्यासाठी लाच मागणाऱ्या 'त्या' पोलीस उपनिरीक्षकाला अटक

कारवाई टाळण्यासाठी लाच मागणाऱ्या लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाला एसीबीने (लाच लुचपत प्रतिबंधक विभाग) अटक केली आहे. या घटनेनंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली. सोलापूर पोलीस (Solapur Police) दलातील सोलापूर शहरात एमआयडीसी पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला.

Police bribe

कारवाई टाळण्यासाठी लाच मागणाऱ्या 'त्या' पोलीस उपनिरीक्षकाला अटक

सोलापूर : कारवाई टाळण्यासाठी लाच मागणाऱ्या लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाला एसीबीने (लाच लुचपत प्रतिबंधक विभाग) अटक केली आहे. या घटनेनंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली. सोलापूर पोलीस (Solapur Police) दलातील सोलापूर शहरात एमआयडीसी पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला. प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी तत्कालीन पोलीस निरीक्षकांच्या संमतीने दोन लाखांची लाचेची मागणी करत एक लाख रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी पोलीस उपनिरीक्षकाने दर्शवली होती. (Police bribe)

विक्रम राजपूत (Vikram Rajpur) असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस (MIDC Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ॲट्रॉसिटी आणि इतर गुन्हे दाखल असताना त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी तक्रारदार आणि त्यांच्या मित्राकडून लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली व त्यास अटक केली. 

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीसात दोन महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास राजपूत करत होते.  त्या व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी राजपूत यांनी स्वतःसाठी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने यांच्या नावाने दोन लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार संबंधित व्यक्तीच्या मित्राने केली होती. त्यानंतर एसीबीने 6 ऑक्टोबर रोजी या तक्रारीची पडताळणी केली तेव्हा राजपूत यांनी एक लाख रुपयांची लाच स्विकारण्यास संमती दर्शवली होती. त्यानंतर एसीबीने सापळा रचून राजपूत यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest