Pune Crime News : ड्रग्सची तस्करी करणारा ललित पाटील पोलिसांच्या तावडीतून फरार

पुण्यातील ससून रुग्णालयात तब्बल 2 कोटींचे ड्रग्स रविवारी सापडल्याने खळबळ माजली होती आणि याच तस्करी प्रकरणातील कुख्यात आरोपीने ससून रुग्णालयातून आता पलायन केले आहे. पुण्यात रविवारी २ कोटी रुपयांचे अमली पदार्थ सापडले होते. याच प्रकरणातील आरोपी फरार झाल्याने चांगलीच खळबळ माजली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 2 Oct 2023
  • 11:49 pm
ड्रग्सची तस्करी करणारा ललित पाटील पोलिसांच्या तावडीतून फरार

ड्रग्सची तस्करी करणारा ललित पाटील पोलिसांच्या तावडीतून फरार

पुण्यातील ससून रुग्णालयात तब्बल 2 कोटींचे ड्रग्स रविवारी सापडल्याने खळबळ माजली होती आणि याच तस्करी प्रकरणातील कुख्यात आरोपीने ससून रुग्णालयातून आता पलायन केले आहे. पुण्यात रविवारी २ कोटी रुपयांचे अमली पदार्थ सापडले होते. याच प्रकरणातील आरोपी फरार झाल्याने चांगलीच खळबळ माजली आहे.

पुण्यातील ससून रुग्णालयात ड्रग्स माफिया ललित पाटील याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज संध्याकाळी सातच्या सुमारास ललित पाटील यांच्या छातीत दुखत असल्याचे कारण एक्स-रे काढण्यासाठी ससून रुग्णालयातील वॉर्ड मध्ये गेला होता. ससून रुग्णालयातील वार्ड क्रमांक 16 येथे एक्स-रे काढण्याच्या बहाण्याने गेल्यानंतर मागच्या आऊट गेटने तो बाहेर पडला. ललित सोबत असणारा गार्ड देखील गायब असल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. पाटील हा रुग्णालयातून बाहेर पडून पुणे स्टेशनच्या दिशेने पळाला असल्याचे सध्या सांगितले जात आहे.

ललित पाटील याचा शहरातील ड्रग्स रॅकेटमध्ये मोठा हात असल्याचा संशय पुणे पोलिसांना होता. यामुळेच तो येरवडा जेल येथे कैदेत होता. काही दिवसांपूर्वी त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 30 सप्टेंबरला ललित ससून रुग्णालयात असतानाच प्रवेशद्वारावर दोन कोटी रुपयांचे ड्रग्स सापडले होते. यानंतर ड्रग्सचे मोठे रॅकेट ललित पटेल चालवत असल्याचा संशय पोलिसांना आला होता. त्यानुसार पोलीस तपास देखील करत होते. मात्र आता ललित पाटील हा पोलिसांच्या तावडीतून फरार झाल्याने पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest