मावळ: दुचाकीच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी

मावळ तालुक्यातील इंदोरी येथे भरधाव दुचाकीने धडक दिल्याने पादचारी व्यक्ती गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी घडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 16 Sep 2024
  • 01:58 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

मावळ तालुक्यातील इंदोरी येथे भरधाव दुचाकीने धडक दिल्याने पादचारी व्यक्ती गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी घडली.

मुकेश तात्याबा चव्हाण (वय ५२, रा. साईनगर, इंदोरी, ता. मावळ) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकी (एमएच -१७/बीसी ०१०६) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चव्हाण हे शुक्रवारी सायंकाळी इंदोरी मार्केटमध्ये भाजीपाला आणण्यासाठी गेले होते. ते मार्केटमध्ये पायी चालत जात असताना भरधाव आलेल्या दुचाकीने त्यांना धडक दिली. त्यामध्ये चव्हाण हे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर दुचाकीस्वार पळून गेला. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest