Drug Mafia Lalit Patil : ड्रग्स माफिया ललित पाटील अखेर पोलिसांच्या ताब्यात

पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात (Sassoon Hospital)उघडकीस आलेल्या ड्रग्स प्रकरणातील (drugs case) मुख्य आरोपी ललित पाटीलला (Lalit patil)अखेर अटक (arrest) करण्यात पोलीसांना यश मिळाले आहे. ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police)चेन्नई येथून ताब्यात घेतले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Wed, 18 Oct 2023
  • 10:38 am
Drug Mafia Lalit Patil

ड्रग्स माफिया ललित पाटील अखेर पोलिसांच्या ताब्यात

पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात (Sassoon Hospital)उघडकीस आलेल्या ड्रग्स  प्रकरणातील (drugs case) मुख्य आरोपी ललित पाटीलला (Lalit patil)अखेर अटक (arrest) करण्यात पोलीसांना यश मिळाले आहे. ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police)चेन्नई येथून ताब्यात घेतले. १८ दिवसांपूर्वी त्याने पुण्यातील ससून रुग्णालयातून पळ काढला होता. त्यानंतर पुणे, नाशिक आणि मुंबई पोलिसाची पथके त्याच्या मागावर होती. अखेर आज पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.  

ललित पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याला ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते, पण या ठिकाणी ९ महिने उपचार घेतल्यानंतर तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला होता. त्यानंतर तो कर्नाटक येथे लपला होता. पुणे पोलिसांबरोबर मुंबई पोलिस देखील त्याच्या मागावर होते. पुणे तसेच मुंबई व नाशिक पोलिसांची दहा पथके ललितचा शोध घेत होते. त्यानंतर मुंबई पोलीसांनी त्याला कर्नाटकमधून अटक केली आहे. मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेने ही कामगीरी केली आहे. 

अशी केली अटक
मुंबई पोलिसांनी नाशिकमध्ये काही दिवसांपुर्वी छापे टाकले होती त्यामध्ये पोलीसांनी कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले होते. ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील हा नाशिक इथल्या कारखान्यात महिन्याला २०० किलो ड्रग्ज बनवत होता. आंतरराष्ट्रीय बाजारात एक किलो ड्रग्जची किंमत १ कोटी रुपये आहे. त्यानंतर ललीत पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला. एकीकडे पुणे पोलीस त्याचा शोध घेत असताना साकीनाका पोलिसांनी गोपनीयता बाळगत तीन पथके ललित पाटीलच्या शोधासाठी तयार केली. त्यांच्याकडे दाखल असलेल्या केसमधील एक अटक आरोपीला ललितने नव्या फोन नंबर वरून फोन केला. याची माहिती मिळताच साकीनाका पोलीस अलर्ट झाले. एक ट्रॅव्हल कंपनीच्या कारने ललित आणि आणि त्याचे दोन सहकारी आधी गुजरात, धुळे मग कर्नाटक आणि नंतर बंगळूरला पोहचला. या सर्व प्रवासादरम्यान ललित हा अटक असलेल्या आरोपीच्या संपर्कात होता. अखेर एक हॉटेलमध्ये तो थांबलेला असताना साकीनाका पोलिसांनी सापळा रचून त्याच्यासह आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्याला आज मुंबईत आणण्याची शक्यता आहे. दरम्यान पोलिसांकडून ललितच्या अटकेबाबत गोपनीयता पाळण्यात आली आहे. 

ड्रग्स रॅकेटमध्ये मोठा हात

ललित पाटील याचा शहरातील ड्रग्स रॅकेटमध्ये मोठा हात असल्याचा संशय पुणे पोलिसांना होता. यामुळेच तो येरवडा जेल येथे कैदेत होता. काही दिवसांपूर्वी त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ३० सप्टेंबरला ललित ससून रुग्णालयात असतानाच प्रवेशद्वारावर दोन कोटी रुपयांचे ड्रग्स सापडले होते. यानंतर ड्रग्सचे मोठे रॅकेट ललित पटेल चालवत असल्याचा संशय पोलिसांना आला होता. त्यानुसार पोलीस तपास देखील करत होते. मात्र आता ललित पाटील हा पोलिसांच्या तावडीतून फरार झाल्याने पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. ससून रुग्णालयाचे व्यवस्थापन, येरवडा कारागृह प्रशासन आणि पुणे पोलीस यांच्या संगनमताशिवाय शक्य आहे का? असा प्रश्न विचारला जात होता. या पार्श्वभूमीवर तब्बल ९ जणांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest