Drug Mafia Lalit Patil Case : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण : येरवडा कारागृहातील 'त्या' पोलीस कर्मचाऱ्याला पुणे पोलीसांकडून अटक

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात (Drug Mafia Lalit Patil Case ) ससून रुग्णालयाचा कर्मचारी महेंद्र शेवते याला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर येरवडा कारागृहातील एका शिपायालादेखील पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.

Drug Mafia Lalit Patil Case

ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण : येरवडा कारागृहातील 'त्या' पोलीस कर्मचाऱ्याला पुणे पोलीसांकडून अटक

पुणे : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात (Drug Mafia Lalit Patil Case ) ससून रुग्णालयाचा कर्मचारी महेंद्र शेवते याला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर येरवडा कारागृहातील एका शिपायालादेखील पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. कारागृहाच्या शिपाईच्या मोबाईलवरून ललित पसार झाल्यानंतर इतरांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने त्यास अटक केली आहे. 

मोईस शेख (Moise Sheikh) (रा. येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या येरवडा कारागृहातील (Yerwada Jail) पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यास ललित पाटील पलायनप्रकरणात बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

ड्रग्ज माफिया ललित पाटील ससून रुग्णालयातून उपचाराच्या नावाखाली पसार झाल्यानंतर या विषयाला वाचा फुटली होती. त्यापूर्वी ससून मधील एक कर्मचाऱ्याला ललित पाटीलचे दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन विकताना करण्यात आली होती. ललित पाटील पळून गेल्यानंतर आतापर्यंत दोन अधिकाऱ्यांसह दहा पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. यातील नाथा काळे आणि अमित जाधव या दोन पोलिसांना अटक देखील करण्यात आली होती. ललित पाटील पळून जाण्यासाठी या दोघांनी मदत केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या दोघांच्याही मोबाईल वरून ललितला पळून जाण्यास मदत करणाऱ्या दत्ता डोके याच्याशी वारंवार संपर्क साधण्यात आलेला होता.

दरम्यान, शासनाने ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना पदममुक्त केले. ससून रुग्णालयातील डॉक्टर व अधिकारी यांच्या मदतीशिवाय दलित पाटील ससून रुग्णालयातून  रॅकेट चालू शकत नव्हता असा आरोप होत होता. त्या दृष्टीने पुणे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. वार्ड नंबर १६ मधील डॉक्टर आणि नर्स वॉर्ड बॉय यांची यांचे जबाब नोंदविण्यात आले. आतापर्यंत एकूण १४ जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्यामधून शेवते याच्याकडे संशयाची सुई फिरली. त्याला पोलिसांनी अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्याचे आणि ठाकूर यांचे घनिष्ट संबंध होते. शेवते हाच या प्रकरणातला ससून मधीक मुख्य कर्ता करविता असल्याचे देखील पोलिसांचे म्हणणे आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest