Domestic violence : मुलाला टिळा लावते म्हणून कौटुंबिक अत्याचार

आंतरजातीय विवाह (Intercaste marriage) केलेल्या महिलेने तिच्या मुलाला हिंदू धर्माप्रमाणे टिळा लावल्याच्या कारणावरून तसेच मुस्लिम महिलांप्रमाणे स्वयंपाक करता येत नसल्याच्या कारणावरून वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देऊन कौटुंबिक अत्याचार (Domestic violence) केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

Domestic violence

मुलाला टिळा लावते म्हणून कौटुंबिक अत्याचार

पुणे : आंतरजातीय विवाह (Intercaste marriage) केलेल्या महिलेने तिच्या मुलाला हिंदू धर्माप्रमाणे टिळा लावल्याच्या कारणावरून तसेच मुस्लिम महिलांप्रमाणे स्वयंपाक करता येत नसल्याच्या कारणावरून वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देऊन कौटुंबिक अत्याचार (Domestic violence) केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhawa Police) सासरच्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी २८ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना २०१४ पासून आजपर्यंत नाना पेठ, हडपसर, म्हाडा वसाहत, खडीमशीन चौक, मिठा नगर, कोंढवा या ठिकाणी घडली. पोलिसांनी ३१ वर्षीय पती आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील पतीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी पतीचा आंतरजातीय  प्रेम विवाह झालेला होता. त्यांना एक मुलगा देखील आहे. आरोपींनी वेळोवेळी कौटुंबिक कारणावरून या महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली.

मुस्लिम महिलांप्रमाणे स्वयंपाक करता येत नसत्याच्या कारणावरून त्यांना मारहाण करण्यात आली. फिर्यादी महिला  तिच्या मुलाला कपाळावर टिळा लावत होती. त्यावरून चिडलेले आरोपी हा टिळा पुसून या प्रथा आमच्या घरात चालणार नाहीत असे म्हणत होते. त्यांना शारीरिक व मानसिक त्रास देण्यात आरोपींनी सुरुवात केली. त्यांच्याकडून घेतलेले सहा तोळे सोने देखील त्यांना परत करण्यात आले नाहीत. पतीने त्यांच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे देखील फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest