संग्रहित छायाचित्र
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील केंद्रीय विद्यालयातील नराधाम शिक्षकाने शाळेतील दोन विद्यार्थीनी सोबत अश्लीस चाळे करत विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील लोहगाव भागात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने विमानतळ पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून विनयभंग करणाऱ्या शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोहगाव येथे असलेल्या केंद्रीय विद्यालयात आरोपी शिक्षक हा या शाळेत शारीरिक शिक्षणाचा (पीटी) शिक्षक आहे. तक्रारदार महिलेची दहा वर्षाची मुलगी शाळेत असताना दोन आठवड्यांपूर्वी आरोपी शिक्षकाने पीटी क्लास घेत असताना मैदानावर वाईट उद्देशाने तिच्या अंगाला स्पर्श केला. तर दुसऱ्या विद्यार्थीनीला सुद्धा पीटी क्लास घेत असताना बॅड टच करत तुला पीटी क्लास कसा वाटला असे विचारत तिच्याशी अश्लील कृत्य केले. या प्रकारानंतर मुलींनी घरी गेल्यानंतर त्यांच्या आईला हा घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलींच्या आईने विमानतळ पोलिसात धाव घेत शिक्षकाच्या विरोधात तक्रार दाखल केली. पुढील तपास विमानतळ पोलिस करत आहेत.