पुण्यातील गुन्हेगारीला चाप बसणार, ६५ गुंडांना हद्दपार करण्याचे आदेश

पुण्यातील दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच चालली आहे. त्यामुळे गुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी एकाचवेळी ६५ गुंडांना पुणे शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. हडपसर आणि वानवडी भागातील भागातील ६५ गुंडांना पुणे शहर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी दिले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Monika Yenpure
  • Sat, 29 Jul 2023
  • 05:07 pm
पुण्यातील गुन्हेगारीला चाप बसणार, ६५ गुंडांना हद्दपार करण्याचे आदेश

पुण्यातील गुन्हेगारीला चाप बसणार, ६५ गुंडांना हद्दपार करण्याचे आदेश

पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी दिले आदेश

पुण्यातील दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच चालली आहे. त्यामुळे गुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी एकाचवेळी ६५ गुंडांना पुणे शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. हडपसर आणि वानवडी भागातील भागातील ६५ गुंडांना पुणे शहर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी दिले आहेत.

पुण्यातील वानवडी परिसरात मोठ्या प्रमाणात तोडफोडीच्या घटना समोर येत आहेत. तसेच हडपसरसह इतर भागातून विनयभंग, मारहाण, तोडफोड, लुटमार यासह अन्य घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीसांनी गुंडांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

पोलीसांच्या आदेशानुसार, हडपसर, वानवडी भागातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारांची माहिती संकलित करण्यात आली. सराइतांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये (हद्दपार) कारवाई करण्यात आली. गुंडांना पुणे शहर, जिल्हा, तसेच पिंपरी-चिंचवड शहरातून हद्दपार करण्यात आले आहे. एकाचवेळी ६५ गुंडांना तडीपार करण्यात आल्यामुळे रहिवाशांनी मोकळा श्वास घेतला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest