संग्रहित छायाचित्र
भाडेकरूने लपून घरमालकिणीचे ती आंघोळ करीत असताना मोबाईलमध्ये चित्रीकरण करून विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गजानन कोकाटे (वय ३५) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी ३४ वर्षीय महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी कोकाटे हा या महिलेच्या घरामध्ये मागील एक वर्षापासून भाडेकरू म्हणून राहात होता. त्याचे पत्नीसोबत पटत नसल्याने वारंवार भांडणे होत होती. त्यामुळे तो कुटुंबासोबत राहात नाही. तो एका ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये काम करीत होता. त्याला एक महिन्यापूर्वी कामावरून काढून टाकण्यात आले होते. मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही महिला तिच्या घरात आंघोळ करीत असताना आरोपीने मोबाईलमध्ये चोरून चित्रीकरण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.