Pune Crime : पुतण्याकडून कोट्यावधींची फसवणूक चुलतीने केला गुन्हा दाखल

स्वतःच्या पुतण्याकडे विश्वासाने घरातील कपाटाच्या आणि घराच्या चाव्या दिल्यानंतर त्याने २५ लाख ७२ हजार रुपयांचे रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने तसेच बँक खात्यातील ५० लाख रुपयांची रक्कम लंपास केली. चुलतीची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी

Pune Crime

संग्रहित छायाचित्र

पुणे : स्वतःच्या पुतण्याकडे विश्वासाने घरातील कपाटाच्या आणि घराच्या चाव्या दिल्यानंतर त्याने २५ लाख ७२ हजार रुपयांचे रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने तसेच बँक खात्यातील ५० लाख रुपयांची रक्कम लंपास केली. चुलतीची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी खडक पोलीस (Khadak Police) ठाण्यामध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २ एप्रिल २०१८ ते एप्रिल २०२३ या कालावधी दरम्यान शुक्रवार पेठ आणि रविवार पेठेमध्ये घडला. (Pune Crime News)

प्रीतम प्रवीणचंद्र दर्डा (Pritam Praveenchandra Darda) (रा. १५०४, शुक्रवार पेठ, भूतकर हौदाजवळ) असे गुन्हा दखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विजया प्रकाशचंद्र दर्डा (Vijaya Prakashchandra Darda) (वय ७०, रा. ७५६, शुक्रवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी प्रीतम हे विजया यांचे पुतणे आहेत. फिर्यादी विजया यांनी त्यांच्या घराच्या आणि कपाटाच्या चाव्या विश्वासाने प्रवीण यांच्याकडे दिलेल्या होत्या. त्यांनी घरातील सोन्या चांदीचे ५९ तोळ्यांचे दागिने, २५ लाख ७२ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम याचा अपहार केला. (Fraud)

यासोबतच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचे आहे ), असे खोटे सांगितले. विजया यांच्या पतीच्या मोबाईल नंबरचा वापर केला. त्यांच्या संमतीशिवाय विजय यांच्या बँक खात्यातील ५० लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम विविध प्रकारे काढून घेत त्यांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. त्याच्या तपासावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest