Crime : जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी

जुन्या भांडणाच्या कारणावरून नातेवाईक असलेल्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना शुक्रवारी (८ डिसेंबर) रात्री काळेवाडी फाटा आणि पवार नगर थेरगाव येथे घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्ह्यांची वाकड पोलीस (Wakad Police) ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Pimpri Chinchwad News

जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी

परस्पर विरोधात गुन्हा दाखल

जुन्या भांडणाच्या कारणावरून नातेवाईक असलेल्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना शुक्रवारी (८ डिसेंबर) रात्री काळेवाडी फाटा आणि पवार नगर थेरगाव येथे घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्ह्यांची वाकड पोलीस (Wakad Police) ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. (Pimpri Chinchwad Crime)

अमोल भास्कर जावळे (Amol Bhaskar Jawle) (वय ३३, रा. थेरगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अमोल यांचा आते भाऊ संदीप बबन सोनवणे (वय ३२), आशितोष बबन सोनवणे (वय २८), प्रदीप राजेंद्र शिंदे (वय ३०) आणि इतर तीन ते चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अमोल यांची आत्या आणि आतेभाऊ संदीप सोनवणे यांनी अमोल यांना फोन करून भेटायचे असल्याचे सांगितले. तसेच ते अमोल यांना भेटण्यासाठी ग्लोबल हॉस्पिटल येथे आले. आपले जुने वाद उद्या बसून मिटवू असे अमोल बोलत असताना संदीप याने अमोल यांचा चुलत भाऊ दुशांत याला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दुशांत याचे लग्न होऊ देणार नाही, अशी त्यांनी धमकी दिली. तसेच इतर आरोपींना ग्लोबल हॉस्पिटल येथे बोलावून घेऊन अमोल आणि त्यांच्या भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ केली. अमोल यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याच्या परस्पर विरोधात संदीप बबन सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोल भास्कर जावळे (वय ३६), दोन महिला, दुशांत सुधाकर जावळे (वय २८), रोहन सरोदे (वय २८), रोहन गवळी (वय ३०) आणि इतर तीन ते चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप यांचा मामे भाऊ अमोल याच्या सांगण्यावरून दोन महिलांनी संदीप यांच्या घरी येऊन त्यांच्या पत्नीला शिवीगाळ केली. संदीप आणि त्याची आई ग्लोबल हॉस्पिटल येथे गेले असता त्यांना तिथे मारहाण करण्यात आली. संदीप यांचा लहान भाऊ आशुतोष व मावस भाऊ प्रदीप यांना देखील मारहाण केली. आरोपींना अडवत असताना त्यांनी काळेवाडी फाटा येथील बीआरटी मध्ये पुन्हा संदीप यांना मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास वाकड पोलीस करीत आहेत.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest