Pune Crime News : 'काला-पिला' जुगार खेळायला घेऊन जात फसवणूक; जबरदस्तीने ३५ हजार काढून घेतले

बुलढाणा येथे गावी जाण्यासाठी बसची वाट पाहत उभ्या असलेल्या तरुणाला जबरदस्तीने 'काला पिला' जुगार खेळायला घेऊन जात त्याच्याकडून जबरदस्तीने ३५ हजार रुपये काढून घेब्यात आल्याची घटना घडली.

Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

पुणे : बुलढाणा येथे गावी जाण्यासाठी बसची वाट पाहत उभ्या असलेल्या तरुणाला जबरदस्तीने 'काला पिला' जुगार खेळायला घेऊन जात त्याच्याकडून जबरदस्तीने ३५ हजार रुपये काढून घेब्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी विमानतळ पोलीस (Vimantal Police) ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी रात्री साडेआठ ते सव्वा नऊच्या दरम्यान नगर रस्त्यावरील खराडी बायपास या ठिकाणी घडला. (Pune Crime News) 

 किशोर एकनाथ खंडागळे (Kishore Eknath Khandagale)  (वय ३१, रा. सासवड) यांनी फिर्याड दिली आहे. याप्रकरणी चार अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडागळे हे गावी जाण्यासाठी खराडी बायपास येथे बसची वाट पाहत उभे होते. त्यावेळी एका आरोपीने त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्यासोबत ओळख करून घेतली. त्यांना काला पिला जुगार खेळायला जबरदस्तीने सोबत नेले. त्या ठिकाणी असलेल्या अन्य आरोपींनी त्यांना 'तुम्ही आत्ताच ३५ हजार रुपये जिंकलात' असे सांगितले. परंतु, खंडागळे यांनी 'मी अजून खेळलोच नाही. तर मी कसा जिंकलो?' असा प्रश्न केला.

 त्यावर चिडलेले आरोपींनी त्यांना हाताने मारहाण केली आणि 'तुझ्याकडे पैसे असल्याशिवाय तुला जाऊ देणार नाही' असे म्हणत त्याच्या मोबाईलवरून तसेच रोख स्वरूपात ३५ हजार रुपयांची जबरदस्तीने काढून घेतली असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest