Pune Crime News : 'कॅनरी हाय इंटरनॅशनल स्कूल' फसवणूक प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल

आयुष्मती ट्रस्ट या संस्थेकडे 'कॅनरी हाय इंटरनॅशनल स्कूल'ची (Canary High International School)मान्यता असून त्याआधारे शाळा सुरू करण्याच्या बहाण्याने १ कोटी १७ लाख ६७ हजार ५७९ रुपयांची गुंतवणूक करायला लावत भागीदारी देण्यात आली.

Pune Crime News

'कॅनरी हाय इंटरनॅशनल स्कूल' फसवणूक प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल

सी. पी. गोयंका इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य विरोधात गुन्हा

पुणे : आयुष्मती ट्रस्ट या संस्थेकडे 'कॅनरी हाय इंटरनॅशनल स्कूल'ची  (Canary High International School)मान्यता असून त्याआधारे शाळा सुरू करण्याच्या बहाण्याने १ कोटी १७ लाख ६७ हजार ५७९ रुपयांची गुंतवणूक करायला लावत भागीदारी देण्यात आली. परंतु, कोणत्याही प्रकारचे अधिकार न देता शाळा बंद करून फसवणूक (Fraud) करण्यात आली. याप्रकरणी येरवडा पोलीस (Yerwada Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News) 

सी. पी. गोयंका इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या शेफाली तिवारी, तन्मय शर्मा, रोहित भार्गव (रा. पुणे नगर रस्ता, वाघोली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पौर्णिमा मिलिंद कोठारी (वय ६३, रा. उत्तम टॉवर्स, द आगाखान पॅलेस समोर, नगर रोड, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट २०१९ पासून ३१ मार्च २०२३ या कालावधी दरम्यान 'कॅनरी हाय इंटरनॅशनल स्कूल' शास्त्रीनगर, येरवडा या ठिकाणी घडला.

 येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेफाली तिवारी या सि टी गोयंका इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य आहेत. तिवारी यांनी कोठारी यांना त्यांची आयुष्मती नाव ट्रस्ट नावाची संस्था असल्याचे सांगितले. या ट्रस्टकडे 'कॅनरी हाय इंटरनॅशनल स्कूल' चालवण्याबाबतच्या परवानगी असल्याचे भासवले. ही शाळा सुरू करून एक ते दोन वर्षांसाठी पैसे गुंतविण्यास त्यांना सांगण्यात आले. कोठारी यांच्याकडून भागीदार म्हणून १ कोटी १७ लाख ६७ हजार ५७९ रुपये खर्च करण्यास भाग पाडले. कोठारी आणि त्यांच्या मुलाला ७० टक्के भागीदारी देण्यात आली. परंतु, त्यांना कोणत्याही प्रकारचे अधिकार देण्यात आले नाहीत.

शाळेच्या नावाने असलेल्या बँक खात्यावर जमा होणारी रक्कम स्वतःच्या फायद्याकरता आरोपींनी वापरली. शाळा बंद पडल्यानंतर त्याबाबत पालकांनी आरोपींकडे विचारणा करण्यास सुरुवात केली. तेव्हा ही शाळा बंद पडण्यास कोठारी या कारणीभूत असल्याचे पालकांना खोटे सांगत त्यांची बदनामी  केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले. या प्रकरणी न्यायालयामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने १५६ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest