Crime : गॅस चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा

अवैधरीत्या मोठ्या सिलिंडर मधून लहान सिलिंडरमध्ये गॅस काढून घेत त्याची चोरी करणाऱ्या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (९ डिसेंबर) सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास अमली पदार्थ विरोधी पथकाने मोरेवस्ती चिखली येथे केली.

gas theft

संग्रहित छायाचित्र

अवैधरीत्या मोठ्या सिलिंडर मधून लहान सिलिंडरमध्ये गॅस काढून घेत त्याची चोरी करणाऱ्या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (९ डिसेंबर) सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास अमली पदार्थ विरोधी पथकाने मोरेवस्ती चिखली येथे केली. (Crime News) 

सागर रमेश वाघमारे (Sagar Ramesh Waghmare) (वय २५), अजय जैन, मुकेश ट्रेडर्स (सर्व रा. चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रसाद जंगीलवाड यांनी चिखली पोलीस (Chikhali Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर याने त्याचा मालक अजय जैन याच्या सांगण्यावरून मुकेश कडून गॅसचे सिलेंडर विकत घेतले. त्यामध्ये घरगुती सिलेंडर मधून अवैधरीत्या कोणतीही सुरक्षेची काळजी न घेता गॅस काढला. याबाबत माहिती मिळाली असता अंमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी सायंकाळी छापा मारून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी २७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest