Pune Crime News : वॉचमन नसलेल्या सोसायट्यांमध्ये घरफोड्या, सराईत घरफोड्यासह त्याच्या प्रेयसीला अटक

शहराच्या विविध भागात फिरून दिवसा घरपोडी करणाऱ्या सराईत आरोपीसह त्याच्या प्रेयसीला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी मुंबईच्या सराफाला विकलेला तब्बल ३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Pune Crime News : वॉचमन नसलेल्या सोसायट्यांमध्ये घरफोड्या, सराईत घरफोड्यासह त्याच्या प्रेयसीला अटक

वॉचमन नसलेल्या सोसायट्यांमध्ये घरफोड्या, सराईत घरफोड्यासह त्याच्या प्रेयसीला अटक

३ लाख २० हजारांचा ऐवज जप्त : सिंहगड रोड पोलिसांची कारवाई

पुणे : शहराच्या विविध भागात फिरून दिवसा घरपोडी करणाऱ्या सराईत आरोपीसह त्याच्या प्रेयसीला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी मुंबईच्या सराफाला विकलेला तब्बल ३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सिंहगड रोड पोलिसांच्या तपास पथकाने ही कारवाई केली. विशेष म्हणजे हा आरोपी वॉचमन नसलेल्या सोसायटयांमध्ये घुसून चोरी करीत होता.

रोहित चेतन शेट्टी (वय २७, रा. दिवा, ठाणे) आणि आलीझा ताहीर सय्यद (वय २२, रा. मुंबई) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या वडगाव परिसरामध्ये दिवसा घरफोडीच्या घटना घडलेल्या होत्या. त्या अनुषंगाने तपास पथकाने चोरट्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. याच काळामध्ये पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासामध्ये आरोपी शेट्टी हा मुंबई येथील सराईत घरफोड्या असून तो पुण्यात येऊन चोऱ्या करतो अशी माहिती प्राप्त झाली. तपास पथकातील अंमलदार सागर शेडगे, देवा चव्हाण, अविनाश कोंडे यांना खबऱ्यामार्फत ही माहिती मिळाली होती. आरोपी शेट्टी हा मुंबई-बेंगलोर महामार्गावर असलेल्या  सेवा रस्त्यावरील एका मोकळ्या जागेमध्ये असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार या ठिकाणी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीमध्ये  त्याने चोरी केल्याचे कबूल केले. चोरीचे दागिने त्याने  मैत्रीण आलीझा सय्यद हिच्याकडे विक्री करण्यासाठी दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या महिलेला देखील अटक करण्यात आली आहे. आरोपींनी दोन घरफोड्यांमधील मुद्देमाल मुंबईमध्ये विक्री केला होता. पोलिसांनी मुंबईला जाऊन हा विक्री केलेला ३  लाख २० हजार रुपयांचे नऊ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले. शेट्टी याच्यावर मुंबई आणि पुणे शहरात घरफोडीचे १४ गुन्हे दाखल आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन म्हणाले, की शेट्टी आणि आलीझा यांची चोरीची पद्धत ठरलेली आहे. शेट्टी पुण्यामध्ये येऊन विविध भागात फिरतो. ज्या सोसाटयांना वॉचमन नाहीत अशा सोसायटया तो हेरून ठेवायचा. या सोसायटयांमध्ये जाऊन बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरी करायचा. चोरी केल्यानंतर मिळालेला ऐवज तो आलिझा हिच्याकडे विक्रीकरिता देत होता. या दोघांनी मुंबईमधील एक सराफाला चोरी केलेला ऐवज परत मिळवण्यात आला आहे. त्याला सीसीटीव्ही फुटेजवरुन शोधून अटक करण्यात आल्याचे निरीक्षक महाजन यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest