Pune Crime : हडपसरमध्ये घरफोडी... लाखोंचा मुद्देमाल लंपास

हडपसरच्या काळेपडळ मध्ये असलेल्या निर्मल टाऊनशिप मधील फ्लॅट फोडून चोरट्यांनी तब्बल ११२ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ३६० ग्राम चांदीचे दागिने तसेच रोकड घरफोडी (burglary) करून चोरून नेली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadpsar Policce) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

Pune Crime

हडपसरमध्ये घरफोडी... लाखोंचा मुद्देमाल लंपास

पुणे : हडपसरच्या काळेपडळ मध्ये असलेल्या निर्मल टाऊनशिप मधील फ्लॅट फोडून चोरट्यांनी तब्बल ११२ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ३६० ग्राम चांदीचे दागिने तसेच रोकड घरफोडी (burglary) करून चोरून नेली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadpsar Policce) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

शुभम संजय कुंजीर Shubham Kunjir) (वय २४, रा. निर्मल टाउनशिप समोर, काळेपडळ, फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली आहे. कुंजीर १५ नोव्हेंबर रोजी यांच्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. ते १७ नोव्हेंबर रोजी परत आले. त्यावेळी त्यांच्या घराच्या दरवाजाचे लॉक तोडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी घरामध्ये जाऊन पाहिले असता घराचे लॉक तोडून बेडरूम मधील दोन लाख ३९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी हडपसर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest