पुण्यात प्रेयसीकडून प्रियकराचा चाकूने वार करून खून - पोलीस

प्रेम प्रकरणातून प्रेयसीने आपल्या प्रियकराचा चाकूने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुणे शहरातील वाघोली परिसरातील एका भाड्याच्या खोलीत घडली आहे. सध्या लोणीकंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 29 May 2023
  • 11:59 am
पुण्यात प्रेयसीकडून प्रियकराचा चाकूने वार करून खून

पुण्यात प्रेयसीकडून प्रियकराचा चाकूने वार करून खून

रात्री शुल्लक कारणावरून वाद झाल्याने प्रेयसीने केले चाकूने वार

प्रेम प्रकरणातून प्रेयसीने आपल्या प्रियकराचा चाकूने वार करून खून (Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुणे शहरातील वाघोली (Wagholi) परिसरातील एका भाड्याच्या खोलीत घडली आहे. सध्या लोणीकंद (lonikand) पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियकर आणि प्रेयसी हे दोघे गेल्या काही महिन्यांपासून वाघोली परिसरातील एका भाड्याच्या खोलीत राहत होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते, ते एकाच वर्गात शिकत असून कम्प्यूटर सायन्सचे विद्यार्थी होते. त्यांचे वय सुमारे २१ वर्ष असल्याचे होते. रविवारी संध्याकाळी दोघेही वाघोतील खोलीत आले. यावेळी दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला.

मात्र, हा वाद इतका विकोपाला गेला की प्रेयसीने घरातील भाजी कापण्याच्या चाकूने प्रियकरावर सपासप वार केले. या हल्ल्यात प्रियकर रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता. घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीसांनी प्रियकराला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. तसेच संबंधित प्रेयसीही यामध्ये जखमी झाली आहे. लोणीकंद पोलिसांनी याप्रकरणी शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवला आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात प्रेयसी विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest