फुकटात सिगारेट न दिल्याने डोक्यात घातली बिअरची बाटली

फुकटात सिगारेट न दिल्याच्या रागातून दोघाजणांनी पान टपरी चालकाच्या डोक्यात बियरची बाटली मारून त्याला दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा घटना येरवडा येथील न्याती मिडोस सोसायटीच्या जवळ घडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Wed, 6 Sep 2023
  • 11:15 am
Pune Crime News

फुकटात सिगारेट न दिल्याने डोक्यात घातली बिअरची बाटली

पुणे : फुकटात सिगारेट न दिल्याच्या रागातून दोघाजणांनी पान टपरी चालकाच्या डोक्यात बियरची बाटली मारून त्याला दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा घटना येरवडा येथील न्याती मिडोस सोसायटीच्या जवळ घडली. 

येरवडा पोलिसांनी दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रोशनकुमार संतलाल कोरी (वय २१, रा. सैनिक वाडी, वडगाव शेरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशन कुमार कोरी हे न्याती मिडोस सोसायटी जवळ असलेल्या सैनिकवाडीच्या जवळ पान टपरी चालवतात. दोन अज्ञात आरोपी त्यांच्या पान टपरीवर आले. त्यांनी कोरी यांच्याकडे फुकटात सिगारेट मागितली. कोरी यांनी सिगारेट देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने आरोपींनी त्यांच्या डोक्यात बियरची बाटली मारून त्यांना जखमी केले. त्यानंतर दगडाने मारहाण केली. त्यांच्या पान टपरीच्या शेजारी असलेल्या टेलर दुकानदार, पाणीपुरीवाला आणि नारळवाला यांना देखील शिवीगाळ करून धमकी दिल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest