पिंपरी-चिंचवड : आरोपीला पकडणाऱ्या दोन पोलिसांच्या हाताला चावा

चाकूने जखमी झालेल्या तरुणाच्या मदतीसाठी गेलेल्या दोन बिट मार्शलला आरोपी तरुणाने हाताला चावा घेऊन जखमी केल्याची घटना सोमवारी (२२ एप्रिल) सायंकाळी सात वाजता धनगरबाबा मंदिराच्या मागे, थेरगाव येथे घडली.

Pimpri Chinchwad Crime

संग्रहित छायाचित्र

चाकूने जखमी झालेल्या तरुणाच्या मदतीसाठी गेलेल्या दोन बिट मार्शलला आरोपी तरुणाने हाताला चावा घेऊन जखमी केल्याची घटना सोमवारी (२२ एप्रिल) सायंकाळी सात वाजता धनगरबाबा मंदिराच्या मागे, थेरगाव येथे घडली. (Pimpri Chinchwad Crime)

सुरज चंद्रकांत कुऱ्हाडे (वय २२, रा. धनगरबाबा मंदिराच्या मागे, थेरगाव) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार मच्छिंद्र व्हरकटे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस अंमलदार व्हरकटे आणि दिनकर पोंदकुले हे बीट मार्शलवर असताना त्यांना नियंत्रण कक्षातून धनगरबाबा मंदिराच्या मागे, थेरगाव येथे मदतीसाठी कॉल आला. त्यानुसार ते धनगरबाबा मंदिराच्या पाठीमागील बाजूला गेले. तिथे आरोपी सुरज याने विलास कांबळे या व्यक्तीला चाकूने मारून जखमी केले होते. त्यामुळे पोलीस अंमलदार व्हरकटे यांनी सुरज याला पोलीस ठाण्यात चल, असे म्हटले. त्यानंतर सुरज तिथून पळून जाऊ लागला. त्यामुळे व्हरकटे यांनी सुरज याला पकडले. त्यावेळी त्याने पोलीस अंमलदार व्हरकटे यांच्या हाताला चावा घेतला. त्यांच्या मदतीसाठी आलेले काळेवाडी बीट मार्शलचे अंमलदार सत्यनारायण पिल्लामारी यांच्या देखील दंडाला आरोपीने चावा घेऊन जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

पोलिसांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढते

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या सहा वर्षांत तब्बल २७६ पोलिसांवर हल्ले झाले आहेत. कारवाई करताना झालेली धक्काबुक्की ते थेट वाहनाने उडवून केलेला प्राणघातक हल्ला असे या हल्ल्यांचे स्वरूप आहे.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest