Pune Accident news : मोटारीला धडकून दुचाकी चालकाचा मृत्यू

भरधाव दुचाकी आणि कारची धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी दुपारी दीड वाजता दीप बंगला चौकामध्ये घडला. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Tue, 10 Oct 2023
  • 03:40 pm
Pune Accident news

संग्रहित छायाचित्र

पुणे : भरधाव दुचाकी आणि कारची धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये (Pune Accident news) दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी दुपारी दीड वाजता दीप बंगला चौकामध्ये घडला. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अर्पण महेश महाजन (वय २०, रा. अनंत अपार्टमेंट, मॉडेल कॉलनी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी , पोलीस हवालदार बाबासाहेब पांडुरंग दांगडे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्पण हा त्याच्या दुचाकीवरून बंगला चौकामधून जात होता. त्याने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून अतिशय वेगात आणि हलगर्जीपणाने दुचाकी चालवली. ही दुजाकी मोटारला (एमएच १२, व्हीएफ ०१२८) जाऊन धडकली. या अपघातात अर्पण गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest