Crime News : जिवलग मित्राचा चाकूने वार करत केला खून; 'हे' आहे कारण

अश्लील शिवीगाळ केल्याच्या कारणावरून चाकूने वार करत दोन मित्रांनी तिसऱ्या जिवलग मित्राचा खून (Murder) केला. खून केल्यानंतर मित्राचा मृतदेह (dead body) नाल्यात फेकून दिला. मित्राच्या पत्नीने बेपत्ता झाल्याची तक्रार देताच दोघे मित्र तिची भेट घेऊन नंतर पळून गेले. पोलिसांनी (Pune Crime) आठ दिवसांच्या तपासानंतर दोघांना अटक केली आहे.(Pimpri Chinchwad Crime)

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Wed, 18 Oct 2023
  • 01:47 pm
Crime News

संग्रहित छायाचित्र

खून लपविण्यासाठी मृतदेह नाल्यात फेकला; बेपत्ताची तक्रार दाखल होताच घेतली होती त्याच्या पत्नीची भेट

रोहित आठवले
अश्लील शिवीगाळ केल्याच्या कारणावरून चाकूने वार करत दोन मित्रांनी तिसऱ्या जिवलग मित्राचा खून (Murder) केला. खून केल्यानंतर मित्राचा मृतदेह (dead body) नाल्यात फेकून दिला. मित्राच्या पत्नीने बेपत्ता झाल्याची तक्रार देताच दोघे मित्र तिची भेट घेऊन नंतर पळून गेले. पोलिसांनी (Pune Crime) आठ दिवसांच्या तपासानंतर दोघांना अटक केली आहे.(Pimpri Chinchwad Crime)

सूरज उर्फ जंजीर कांबळे (वय ३०, रा. थेरगाव) असे खून झालेल्याचे नाव आहे, तर या प्रकरणी त्याचे दोन मित्र पंकज रतन पाचपिंडे (वय २८, रा. थेरगाव) आणि अमरदीप उर्फ लखन दशरथ जोगदंड (वय ३३, रा. थेरगाव गावठाण. मूळ रा. अंबाजोगाई, परळी, जि. बीड) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज कांबळे यांच्या पत्नी आरती कांबळे यांनी ७ ऑक्टोबर रोजी सूरज कांबळे हा बेपत्ता असल्याची तक्रार केली. मात्र, सुरुवातीला पोलिसांना कांबळे याचा शोध लागला नाही. दरम्यान ११ ऑक्टोबर रोजी आरती कांबळे यांनी पुरवणी जबाब दिला. त्यामध्ये पती सूरज हा मित्र पंकज पाचपिंडे आणि अमरदीप जोगदंड यांच्यासोबत दारू पिण्यासाठी गेला. त्यानंतर तो घरी आला नसल्याचे सांगितले. पोलिसांनी पंकज पाचपिंडे आणि अमरदीप जोगदंड यांच्याकडे चौकशी करण्यासाठी त्यांचा शोध घेतला असता ते देखील कोठेतरी निघून गेले असल्याचे समोर आले. त्यामुळे या दोघांवर पोलिसांचा संशय बळावला.

पोलिसांनी त्यांचा ठावठिकाणा शोधला असता दोघेजण बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे लपून बसले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वाकड पोलिसांनी अंबाजोगाई येथून दोघांना ताब्यात घेतले. दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, ५ ऑक्टोबर रोजी सूरज कांबळे आणि आरोपी हे पंकज पाचपिंडे याच्या घरात दारू पिण्यासाठी बसलो होतो. त्यावेळी सूरज कांबळे याने अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्या रागातून पंकज आणि अमरदीप यांनी चाकूने सूरजच्या गळ्यावर वार करून त्याचा खून केला. त्यानंतर पंकज चालवत असलेल्या तीन चाकी टेम्पोमध्ये सूरजचा मृतदेह एका गोधडीत गुंडाळून ठेवला. टेम्पो बावधन येथे नेऊन गायकवाड वस्ती येथील महामार्गाखालून वाहणाऱ्या नाल्यामध्ये आरोपींनी सूरजचा मृतदेह टाकून दिला. त्यानंतर ते दोघे दोन दिवस काहीच घडले नाही अशा आविर्भावात राहिले.

दरम्यान, ७ ऑक्टोबर रोजी कांबळे बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने दिली असल्याचे आरोपींना समजले. त्यानुसार आरोपींनी आरती कांबळे यांची घरी जाऊन भेट घेतली. पाच ऑक्टोबर रोजी आम्ही त्याच्यासोबत दारू प्यायलो होतो. परंतु दारू पिल्यानंतर तो मध्यरात्री एकच्या सुमारास घरी परत गेला, असे आरोपींनी आरती यांना सांगितले. सूरज बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्याने पोलीस आपल्याकडे देखील चौकशी करतील, या भीतीने दोघे आरोपी ८ ऑक्टोबर रोजी पसार झाले. अमरदीप जोगदंड हा बीड जिल्ह्यात राहात असल्याने आरोपींनी त्याच्या गावी जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे आरोपींनी पोलीस तपासात सांगितले.

सूरज हा शेवटच्या दिवशी कोणाकडे गेला होता याची माहिती मिळाल्याने आरती यांनी पुरवणी जबाब दिला. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, निरीक्षक विठ्ठल साळुंखे, सहायक निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण, सहायक पोलीस फौजदार बाबाजान इनामदार, पोलीस अंमलदार संदीप गवारी, स्वप्नील खेतले, दीपक साबळे, आतिश जाधव, प्रमोद कदम, प्रशांत गिलबिले, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, राम तळपे, अजय फल्ले, भास्कर भारती, स्वप्नील लोखंडे, सौदागर लामतुरे, कौंतेय खराडे, विनायक घारगे, रमेश खेडकर, सागर पंडित यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest