Pune Crime News : व्हाट्सएप ग्रुपमधून रिमूव्ह केल्याने बांबूने मारहाण; चंदननगर येथील इंस्टा गो प्रो कंपनीतील घटना

व्हाट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह केल्याच्या रागातून एका कामगाराने 'इन्स्टा गो प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीच्या अधिकाऱ्याला बांबूने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना जुना मुंढवा रस्त्यावर असलेल्या कंपनीच्या कार्यालयात घडली.

Pune Crime News

व्हाट्सएप ग्रुपमधून रिमूव्ह केल्याने बांबूने मारहाण; चंदननगर येथील इंस्टा गो प्रो कंपनीतील घटना

पुणे : व्हाट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह केल्याच्या रागातून एका कामगाराने 'इन्स्टा गो प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीच्या अधिकाऱ्याला बांबूने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना जुना मुंढवा रस्त्यावर असलेल्या कंपनीच्या कार्यालयात घडली. याप्रकरणी चंदन नगर पोलिसांनी (Chandannagar Police) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

सत्यम शिंगवी (Satyam Shingvi)असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अमोल शेषराव ढोबळे (Amol Dhobale) (वय ३१, रा. खांदवे नगर, लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे. ढोबळे यांची 'इन्स्टा गो प्रायव्हेट लिमिटेड' नावाची कंपनी आहे. या कंपनीमध्ये शिंगवी हा काम करीत होता. त्याच्या विरोधात ग्राहकांच्या खूप सार्‍या तक्रारी येत होत्या. या तक्रारीमुळे ढोबळे यांनी त्याची समजूत काढली होती. वारंवार तक्रारी येत असल्यामुळे त्यांनी त्याला फोन केला. परंतु, त्याने फोन उचलला नाही. म्हणून ढोबळे यांनी त्याला कंपनीच्या ग्रुपमधून बाहेर काढले. त्याचा राग आल्याने शिंगवी याने ऑफिसमध्ये येऊन ढोबळे यांना 'तु मला ग्रुप मधून का काढले? तू बाहेर ये तुझ्याकडे बघतो' असे म्हणत धमकी दिली. त्यानंतर लाकडी बांबू घेऊन आलेल्या शिंगवीने ढोबळे यांना मारहाण केली. तसेच, त्यांचा आयफोन तोडून नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest