Pune Crime News : बी. यु. भंडारी एम अँड एम रिअल्टर्स एलएलबी कंपनी विरोधात फसवणुकीचा गुन्हा

खराडी येथील नियोजित इमारतीमधील पाचव्या मजल्यावरील ऑफिसेस आणि चार कव्हर्ड पार्किंग विक्री करण्यासाठी समजुतीचा करारनामा करून देखील जागेचा ताबा न देता फसवणूक केल्याप्रकरणी बी. यु. भंडारी एम अँड एम रियल्टी कंपनी (B. U. Bhandari M&M Realty Company) विरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बी. यु. भंडारी एम अँड एम रिअल्टर्स एलएलबी कंपनी विरोधात फसवणुकीचा गुन्हा

पुणे : खराडी येथील नियोजित इमारतीमधील पाचव्या मजल्यावरील ऑफिसेस आणि चार कव्हर्ड पार्किंग विक्री करण्यासाठी समजुतीचा करारनामा करून देखील जागेचा ताबा न देता फसवणूक केल्याप्रकरणी बी. यु. भंडारी एम अँड एम रियल्टी कंपनी (B. U. Bhandari M&M Realty Company)  विरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नियोजित इमारतीमधील ऑफिसेस न देता तसेच बुकिंगसाठी दिलेली रक्कम व्याजासह परत न करता २ कोटी १६ लाख रुपयांची फसवणूक (Fraud)केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार ३१ ऑक्टोबर २०२० रोजी घडला. (Pune Crime News)

रजनीश माणिकलाल भंडारी, (Rajnish Maniklal Bhandari) अनुज माणिकलाल भंडारी (Anuj Maniklal Bhandari) (रा. २६४ सिंध सोसायटी, औंध) त्यांची फर्म 'बी. यु. भंडारी एम अँड एम रिअल्टर्स एलपी' अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी नरेश रामचंद्र मित्तल (वय ५९, रा. मित्तल हाऊस, सदाशिव पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. 'बी. यु. भंडारी एम अँड एम रिझल्टी'मार्फत खराडी येथील जागेवर एक इमारत नियोजित करण्यात आलेली होती. या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील ऑफिस क्रमांक ३, ५, ६ आणि ७ अशी २ हजार ५११ चौरसफुटांच्या मिळकती तसेच चार कव्हर्ड पार्किंग देण्याबाबत मित्तल यांच्याशी समजुतीचा करारनामा (एमओयू) करण्यात आला होता.

हा समजुतीचा करारनामा मित्तल यांच्या कार्यालयामध्ये झालेला होता. त्यांच्याकडून एक कोटी चार लाख पाच हजार रुपये त्या पोटी घेण्यात आले. परंतु, त्यांना ऑफिसचा ताबा देण्यात आला नाही. दरम्यान, एमओयूमध्ये ठरलेली रक्कम व्याजासहित परत न करता या रकमेचा अपहर करून दोन कोटी १६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन हे तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest